राज्यात मध्यावधीची चाहूल; विधानसभेसाठी भाजपच्या शिलेदारांची फौज तयार, नावे जाहीर!

राज्यात मध्यावधीची चाहूल; विधानसभेसाठी भाजपच्या शिलेदारांची फौज तयार, नावे जाहीर!

BJP 2024 Election :  देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीला अवघे 1 वर्ष बाकी राहिले आहे. त्याअगोदर भाजपने आपली रणनीती आखली असून त्यांनी एकाचवेळी महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागा व विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  भाजपने एकाच दिवशी महाराष्ट्रातील 48 लोकसभा व विधानसभेच्या 288 जागांवर निवडणुक प्रभारी जाहीर केले आहे. भाजपचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत निवडणुक प्रमुखांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. सर्व नियुक्त प्रमुखांचे अभिनंदन! सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला विजय मिळवून देतील, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे विधानसभेच्या एकुण 288 विधानसभा जागांवर भाजपने आपले निवडणूक प्रमुख नेमले आहेत. यावरुन शिवसेनेचा भार देखील भाजप आपल्याच खांद्यावर घेणार असल्याचे यावरुन स्पष्ट होते आहे.

हिमाचल-कर्नाटक जिंकलं; आता ‘या’ राज्यांत प्रियंका गांधींचे कँपेन पॉलिटिक्स!

या यादीमध्ये बहुतांश नावे ही संभाव्य उमेदवारांची असल्यचे बोलले जात आहे. तसेच ज्यांचा 2019 च्या निवडणुकीत विधानसभेला पराभव झाला होता त्या उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघात निवडणुक प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. यामध्ये कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे, कोपरगाव येथे स्नेहलता कोल्हे, हडपसर येथे योगेश टिळेकर, वडगाव शेरी येथे जगदीश मुळीक यांनी या मतदारसंघात निवडणुक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या उमेदवारांचा 2019 साली निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे अनेक जागांवर भाजपने आपल्या संभाव्य उमेदवारांचीच निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

Monsoon : आला रे पाऊस आला! प्रतिक्षेनंतर अखेर केरळात मान्सून दाखल…

दरम्यान, भाजपने आजच लोकसभा निवडणुकीसाठीदेखील निवडणुक प्रभारींची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुक लागण्याची शक्यता दाट झाली आहे. तसेच 2024च्या लोकसभा निवडणुकीसह विधानसभेची निवडणुक लागण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपने आपली निवडणुकीची मशिनरी मैदानात उतरवल्याचे दिसते आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube