Download App

श्रेय घेणं माझा स्वभाव नाही; जे घेताहेत तो त्यांचा केविलवाणा प्रयत्न, थोरातांची विखेंवर टीका

Balasaheb Thorat on Radhakrishna Vikhe-Patil : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला निळवंडे प्रकल्प (Nilavande Dam)पूर्ण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहुचर्चित निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. तब्बल अनेक 53 वर्षानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आता या धरणावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी श्रेयासाठी लढत बसणं हा माझा स्वभाव नाही, असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी लगावला. (Balasaheb Thorat saind It is not my nature to fight for credit on nilawande dam)

निळवंडे धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यात पोहचल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निळवंडे गावात पाण्याचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधत होते. तेव्हा थोरात थोरातांना पत्रकारांनी धरणाच्या श्रेयवादाविषयी विचारले. तेव्हा थोरात यांनी सांगिलते की, श्रेय लाटणं, श्रेय घेणं हे चालूच असतं. आपण त्याचा फारसा विचार करायचा नाही. जनतेला ठाऊक आहे, श्रेयासाठी लढत बसणं हा माझा स्वभाव नाही. ज्यांना श्रेय घ्यायचं त्यांना श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू द्या, असं थोरात म्हणाले.

आपला ताब्यातील भूगोल देखील पहावा; राऊतांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले 

राज्याच्या अनेक भागात दंगली उसळत आहेत. आधी छत्रपती संभाजी नगर, अकोला, शेवगाव, या शहरात दंगली पेटल्या. त्यानंतर समनापूर आणि कोल्हापुरातही धार्मिक तेढ निर्माण झाली. यावर पत्रकारांनी प्रतिक्रया विचारतात थोरात म्हणाले की, सत्तेसाठी धर्माच्या नावावर हल्ली राजकारण केले जात आहे. कर्नाटकत कॉंग्रेसने केलेल्या भाजपच्या पराभवानंतर राज्यात धार्मिक तेढ आणि सामाजिल सलोखा बिघडवण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. हा भाजपच्या ठरवून केलेल्या स्ट्रॅटेजीचा भाग असल्याचं म्हणत त्यांनी टीका केली.

आगामी लोकसभा निवडणुकांविषयी आतापासूनच विजयाचे दावे केले जात आहेत. अशातच आता बाळासाहेब थोरात यांनीही लोकसभा निवडणुकीविषयी विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 40 जागा महाविकास आघाडीच्या येतील. त्यासाठी फक्त ज्या पक्षाची ताकद जिथं आहे, तिथं त्याच पक्षाला जागा द्यावी लागेल.

बाळासाहेब थोरातांनी दक्षिणेतून लोकसभेची निवडणूक लढली तर लढत चांगली होईल, असं विधान खासदार सुजय विखे यांनी केलं होतं. यावर प्रश्न विचारताच, थोरात खळखळून हसले. मी राजकारणात वैयक्तिक वैर ठेवत नाही. मात्र पक्षाकडून काही जबाबदारी असेल तर ती पाळावी लागते, असं थोरात म्हणाले.

दरम्यान, जे श्रेय घेतात, त्यांना श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू द्या, या थोरातांनी केलेल्या टीकेला आता राधाकष्ण विखे काय उत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us