आपला ताब्यातील भूगोल देखील पहावा; राऊतांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले

आपला ताब्यातील भूगोल देखील पहावा; राऊतांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले

Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊतांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सभागृहात कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. संभाजीनगर येथील शिवसेनेच्या शाखेचा 38 वा वर्धापनदिनानिमित्त राऊत बोलत होते.

राऊत म्हणाले की, शिवसेना फक्त पक्ष नाही तर धगधगात विचार आहे. इतिहास हा पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो. मात्र इतिहास पाहत असताना आपण भूगोलही पाहिला पाहिजे. आपल्या ताब्यात किती भूगोल आहे याचादेखील अभ्यास करायला पाहिजे. मराठवाडा हा किती मोठा आहे. आपल्या प्रमुख नेत्यांनी याचे आत्मचिंतन करायला पाहिजे. शिवसैनिक का आले आहे याचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे, असे राऊत म्हणाले.

.. तर आम्ही न्यायालयात जाणार; नार्वेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांनी ठणकावले!

आजपर्यंत अनेकवेळा संभाजीनगरला आलो. पण कार्यक्रमाला कधी समोरची गॅलरी रिकामी दिसली नाही. याचा नेत्यांनी विचार करायला पाहिजे, असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच पदाधिकारी हे फक्त एकटे कार्यक्रमाला आले त्यांनी आपल्यासोबत प्रत्येकी 10 शिवसैनिकांना आणले नाही, अशा शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.

दहावी, बारावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; वनरक्षक पदाच्या 2138 जागांसाठी भरती

दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत संभाजीनगर जिल्ह्यातील पाच आमदार गेले आहेत. त्यामध्ये संभाजीनगरचे सध्याचे पालकमंत्री संदीपान भूमरे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे आणि मंत्री अब्दुल सत्तार हे आहे. संभाजीनगरला शिवसेनेचा गड मानले जाते. सध्या शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यामध्ये मोठा संघर्ष याठिकाणी पहायला मिळतो आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंह रजपूत हे फक्त ठाकरे गटासोबत राहिले आहेत. त्यामुळे याठिकाणी शिवसेना व ठाकरे गट यांच्यात मोठा संघर्ष दिसून येत आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube