.. तर आम्ही न्यायालयात जाणार; नार्वेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांनी ठणकावले!

.. तर आम्ही न्यायालयात जाणार; नार्वेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांनी ठणकावले!

Sanjay Raut replies Rahul Narvekar : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही त्यांच्या या वक्तव्यावर भाष्य केले आहे. आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचा मान ठेवतो. अध्यक्षांनी जर 90 दिवसांत निर्णय दिला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा राऊत यांनी दिला.

संजय राऊत आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोल्हापूर दगडफेक, बीआरस पक्षाच्या राज्यातील सभा, भाजप नेत्यांची वक्तव्ये या मुद्द्यांवर त्यांनी रोखठोक मते व्यक्त केली.

Rahul Narvekar : लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार; नार्वेकरांच्या वक्तव्याने खळबळ

विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी काल मी लवकरच एक क्रांतीकारक निर्णय घेईल असे वक्तव्य केले होते. याबद्दल पत्रकारांनी राऊत यांना विचारले. त्यावर राऊत म्हणाले, आमचा विधानसभा अध्यक्षांवर विश्वास आहे. आमचं व्यक्तीशी भांडण असू शकतं. कारण व्यक्ती जी आहे ती अनेक पक्ष बदलून खुर्चीवर बसली आहे. पण, शेवटी ती घटनात्मक खुर्ची आहे. घटनात्मक पद आहे. त्यामुळे न्यायालयाचे निर्देश आणि अध्यक्ष म्हणूनच त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. मेरिट काय आहे हे कोर्टाने स्पष्ट केले आहे. कोर्टाच्या निर्णयाबाहेर कुणालाही जाता येणार नाही. त्यांच्या मनात घटनाबाह्य काही असेल आणि तसं काय घडलं तर महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे येणारा काळ ठरवेल, असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केले.

नार्वेकर काय म्हणाले?

1977 ते 78 दरम्यान विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. 77 मध्ये माझा जन्म झाला त्यावेळी बाळासाहेब देसाई यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली. त्यांनी आपल्य आयुष्यात ज्या प्रमाणे क्रांतीकारी निर्णय घेतले त्यातूनच शिकून कदाचित मी पण लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईल.

त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाल्याचे लक्षात येताच नार्वेकरांनी लागलीच चिंता करण्याची काही गरज नाही. निर्णय काय असेल ते सांगितलेलं नाही, असे म्हणत बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी मेरिटवर निर्णय असे म्हटले. त्यालाही दुजोरा देत मेरिटवर निर्णय घेईन असे नार्वेकरांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube