बाळासाहेब थोरातांनी दिले सत्यजित तांबेंना काँग्रेसमध्ये परत येण्याचे संकेत

अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) यांच्यात काल मुंबईत झालेल्या चर्चेनंतर थोरात यांच्या राजीनामा नाट्यावर तूर्तास तरी पडदा पडल्याचे दिसते. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनालाही जायचे थोरातांनी मान्य केलं आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज बाळासाहेब थोरात संगमनेरला परतले. संगमनेरमध्ये येताच भर सभेत  त्यांनी सत्यजित […]

Untitled Design (6)

Untitled Design (6)

अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) यांच्यात काल मुंबईत झालेल्या चर्चेनंतर थोरात यांच्या राजीनामा नाट्यावर तूर्तास तरी पडदा पडल्याचे दिसते. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनालाही जायचे थोरातांनी मान्य केलं आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज बाळासाहेब थोरात संगमनेरला परतले. संगमनेरमध्ये येताच भर सभेत  त्यांनी सत्यजित तांबेंना (Satyajit Tambe) कॉंग्रेसमध्ये परत येण्याचे संकेत दिले.

संगमनेरमध्ये बाळासाहेत थोरातांचे भव्य स्वागत झाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी थोरात हे आमदार डॉ. सुधीर तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्याविषयी काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, यावेळी बोलतांना थोरात म्हणाले, ‘सत्यजित, तुला काँग्रेसशिवाय आणि काँग्रेसलाही तुझ्या शिवाय करमणार नाही. त्यामुळे तू किती दिवस अपक्ष राहणार, हे आपण ठरवू,’ असे सांगत तांबे काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे संकेतही थोरात यांनी दिले.

पाठीवर वार करण्यापेक्षा.., प्रचारसभेत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना ललकारलं

यावेळी ते म्हणाले, सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी करण्यामागे तांत्रिक चुकीचे कारण आहे. जर माझे हे दुखणे नसते आणि मी नाशिकमध्ये असतो, तर ही चूकही झाली नसती. सध्या जरी सत्यजित अपक्ष असले तरी ते फार काळ अपक्ष राहणार नाहीत. भारत जोडा यात्रेत त्यांनीही मोठे काम केले आहे. काँग्रेसचा विचार त्यांच्यात रुजला आहे. आम्ही कोणाही काँग्रेसशिवाय दुसरा विचार करू शकत नाही. त्यामुळे सत्यजित यांना काँग्रेसशिवाय आणि काँग्रेसलाही सत्यजीतशिवाय करमणार नाही, असं थोरात म्हणाले.

 

Exit mobile version