Download App

फडणवीसांसमोरच उदयनराजेंनी काँग्रेस नेत्यांना घेतलं फैलावर

Udayanraje Bhosale On Congress :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांची कराड येथे सभा पार पडली. या सभेसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, प्रवीण दरेकर, अतुल भोसले आदी नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी उदयनराजे भोसलेंनी भाषण करताना काँग्रेस नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.

राज्यामध्ये  40-45 वर्ष काँग्रेस पक्षाचे सरकार होतं. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता.  खरं तर ज्या लोकांना एवढा आशीर्वाद लोकांनी दिला त्यांच्याचकडे या नेत्यांनी दुर्लक्ष केलं. या लोकांना आपण 40 ते 45 वर्ष निवडून दिलं, पण त्यांनी कधी कामे केली नाही. त्यांच्यात इच्छाशक्ती नव्हती, का गरज वाटली नाही, की आम्हाला गृहित धरलं, असे म्हणत उदयनराजेंनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

लाईफ स्टोरी, शैक्षणिक अनुभव अन् मिळालेलं यश, दर्शनाने शेवटच्या भाषणात सांगितलं होतं…

गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्याकडे कृष्णा खोरेची स्थापना करण्याची विनंती केली होती. तेव्हा मुंडे साहेबांनी पक्ष न पाहता लोकांना न्याय मिळावा म्हणून ही योजना सुरु केली. मोदींनी सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी मानून योजना तयार केल्या. राज्यामध्ये देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली या योजना अंमलात आणल्या, असे उदयनराजे म्हणाले.

तसेच भारतीय जनता पक्ष हा घराणेशाहीवर चालत नाही. भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं कर्तृत्व ओळखतो. देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येणारच आहे. पण राज्यामध्येदेखील देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकार येणं गरजेच आहे, असेही ते म्हणाले.

अधिकाऱ्यांना तंबी देण्याची मंत्री विखे पाटलांवर आली वेळ; वाळू विक्री केंद्रावर नक्की काय झालं?

दरम्यान, ही सभा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड या मतदारसंघात आयोजित करण्यात आली होती. भाजप नेते अतुल भोसले यांनी ही सभा आयोजित केली होती. उदयनराजे यांनी बोलताना अतुल भोसलेंना भावी आमदार असे म्हटले. तसेच काही दिवसांपूर्वी न्यूज एरेना इंडिया या संस्थेने कराडच्या या जागेवर भाजपचा विजय होणार, असे सांगितले आहे.

 

Tags

follow us