Download App

‘पुतण्या फुटला मात्र, लांडग्यांची पिलावळ’.. पडळकरांची शरद पवारांवर घणाघाती टीका

Gopichand Padalkar : भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पु्न्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना पडळकर म्हणाले पुतण्या फुटला मात्र, लांडग्यांची पिलावळ छगन भुजबळांच्या मागे लागली. ते पुढे म्हणाले, बहुजनाचा बुरखा पांघरलेला लांडगा हा बहुजनांच्या विरोधी किती आहे हे आपल्याला माहिती आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका शालिनीताई पाटील यांनी त्यावेळी आमदार असताना मांडली होती. तेव्हा त्यांना पक्षातून काढण्यात आलं. मराठा समाजाला पहिल्यांदा विरोध या लबाड लांडग्याने केला.

BJP : ‘तुमच्या याच प्रवृत्तीमुळे संपूर्ण पक्ष फुटला’; बावनकुळेंवरील पवारांची टीका भाजपला झोंबली

गरीब मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी शालिनीताई पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांना पक्षातून काढून टाकलं गेलं. हीच प्रवृत्ती धनगर आरक्षणासाठी जागर यात्रा सुरू करताच टीका करत आहे. धनगर आरक्षणाची लढाई दोन टप्प्यात सुरू आहे. आता लवकरच निकाल अपेक्षित असून भक्कम पुरावे सादर केले आहेत. मात्र, धनगर समाजानेही आरक्षणासाठी रस्त्यावरच्या संघर्षासाठी तयार राहावे असे आवाहन पडळकर यांनी केले.

धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई आपण न्यायालयात लढत आहोत. 8 डिसेंबर 11 आणि 15 डिसेंबर या तीन तारखा धनगर आरक्षणाच्या सुनावणीसाठी दिल्या आहेत. त्यानंतर या प्रकरणावर निकाल दिला जाईल, अशी माहिती पडळकर यांनी मेळाव्यास उपस्थितांना दिली. सरकारला माझा अल्टिमेटम आहे. तुम्ही काहीही करा आणि धनगर समाजातील लोकांना एसटीचा दाखला हातात द्या. कुणी कितीही राजकारण केले तरी धनगर त्याला बळी पडणार नाही. मराठा आणि धनगर हे मोठे समाज आहेत, असेही पडळकर म्हणाले. धनगर समाजाच्या प्रश्नासाठी हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेची घोषणा करून ही संघटना अराजकीय असेल आणि फक्त मेंढपाळ समाजासाठी काम करणार असल्याचेही पडळकर म्हणाले.

‘…तेव्हा मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो’; अजितदादांसमोरच शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान, याआधी जेव्हा पडळकर यांनी पवार कुटुंबियांवर टीका केली होती. तेव्हा राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचा संताप उसळला होता. पडळकर यांच्या विरोधात नेते, कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. राज्यात ठिकठिकाणी पडळकरांविरोधात आंदोलने झाली होती. इतकेच नाही तर भाजप नेत्यांनीही पडळकरांना टीका करताना भान ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतरही पडळकरांनी पुन्हा टीका केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us