Download App

अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू; राम शिंदेंचं मोठं विधान

  • Written By: Last Updated:

Ahmednagar District : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर जिल्हाचे विभाजन (Ahmednagar district division) करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. मात्र, यावर अद्याप कोणताठी ठोस निर्णय झाला नाही. अधून-मधून जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरते, मात्र, त्यानंतर पुन्हा हा मुद्दा थंडबस्त्यात पडतो. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनीही जिल्हा विभाजनासंदर्भात मोठं वक्तव्य केलं.

Short and Sweet Teaser: एका अनोख्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट; ‘शॉर्ट अँड स्वीट’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित 

अनेक जिल्हे हे विभाजनाच्या प्रतीक्षेत आहेत. संख्येच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असं वक्तव्य राम शिंदे यांनी केलं.

नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना राम शिंदेंना नगर जिल्ह्याचे विभाजन होणार का? असा प्रश्न करण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, राज्यात अनेक जिल्हे हे विभाजनाच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. मात्र राज्यात प्रथमता कोणत्या जिल्हाचं विभाजन केले पाहिजे, तर तो म्हणजे नगर जिल्हा. कारण नगर जिल्हा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने अत्यंत मोठा आहे. नगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू आहे. याबाबत लवकरच लवकर निर्णय होणं अपक्षेक्षित आहे,असं ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावर येणार आहे. याच दिवशी महसूल भवनांच्या इमारतीचे इमारतीचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. यासाठी ६१ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तर काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या सोयीसाठी शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची सुरू करण्यात आलं. आता शिर्डी दौऱ्यात मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. हे सर्व पाहता एका दृष्टीने हे जिल्हा विभाजनाच्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहे, असं शिंदे म्हणाले.

जिल्हा विभाजनाचा मुद्दा वेळोवेळी समोर आला. शासन दरबारी याबाबत अनेकदा पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र अद्याप यावर कुठलाही निर्णय झाला नाही. मात्र, आता येत्या निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून राजकीय पक्षांकडून जिल्हा विभाजनाचा मुद्दा हा पुन्हा एकदा चर्चेत आणला जात आहे. त्यामुळं नगर जिल्ह्याचं लवकरच विभाजन होईल,असं राजकीय वर्तृळात बोलल्या जाऊ लागलं.

त्यामुळं जिल्हा विभाजनाची मागणी
प्रशासकीय कारणांसाठी नगर जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन विभाग केल्या गेले. उत्तरेकडील तालुके समृद्ध आहेत. साखर कारखाने, दूध उत्पादन, शैक्षणिक संस्था आणि इतर गोष्टींमुळे उत्तरेतील लोकांचे जीवनमान उंचावले आहे. तर दक्षिणेकडील तालुके बहुतांशी दुष्काळग्रस्त मानले जातात. परिणामी त्यांचे प्रश्नही वेगळे आहेत. नगर हे शहर जिल्ह्याचं मुख्यालय आहे. मात्र, दक्षिणेकडील अकोले, संगमनेर, कोपरगाव तालुक्यांना आपल्या कामासाठी नगरला येणं शक्य होतं नाही. त्यामुळे दक्षिणेतील नागरिकांकडून जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी होत आहे.

Tags

follow us