Download App

भरधाव कार, CNG चा स्फोट; दोघांचा होरपळून मृत्यू, जामखेडमध्ये भीषण अपघात

  • Written By: Last Updated:

Car CNG Blast Two Died At Jamkhed : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड (Jamkhed) तालुक्यात भीषण अपघात (Car Accident) झालाय. भरधाव कार डिव्हाडरला धडकली. त्यामुळं सीएनजीने पेट घेतला. या घटनेत दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

बीडहून जामखेडच्या दिशेने येणारी ईरटीका कार डिव्हायडरला (Ahilyanagar News) धडकली. त्यामुळे गाडीच्या सीएनजीने पेट घेतल्याने कारला भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्यूमध्ये जामखेड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचं समोर येतंय. महादेव दत्ताराम काळे आणि जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल (Accident News) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

अतिशय निर्लज्ज बाई …नमकहराम! संजय राऊतांचा पारा चढला, नीलम गोऱ्हेंवर संताप

आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय. आग इतकी भीषण होती, की ईर्टीका कार पूर्णपणे जळून खाक झाल्याचं समोर आलंय. गाडीमध्ये जळून मृत्यू झालेल्यांमध्ये जामखेडचे पोलीस कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल आणि जामखेडमधील साईनाथ पान शॉपचे व्यापारी महादेव काळे यांचा समावेश आहे. कारने रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडक दिली होती, त्यानंतर जवळपास 150 फूट कार फरफटत गेली. त्यामुळे सीएनजीने पेट घेतला अन् कार जळून खाक झाली.

रसिकांसाठी मेजवाणी! प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे ‘या’ महोत्सवात गायन

कार अत्याधुनिक होती, त्यामुळे ती डिव्हायडरला धडकल्याने लॉक झाली. गाडीमध्ये असलेल्या दोघांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे कारला लागलेल्या आगीत त्यांचाही होरपळून मृत्यू झालाय. कारबरोबर दोघांचाही जळून कोळसा झालाय, त्यांची ओळख पटणे देखील अशक्य होतं. मोबाईलवरून अखेर त्यांची ओळख पटली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत असल्याची माहिती मिळतेय.

 

follow us