Karjat Bazar Committee : नगर जिल्ह्यातील कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Karjat Market Committee)निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. या बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)आणि भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात थेट लढत झाली होती. मात्र, दोन्ही गटांना समसमान जागा मिळाल्याने येथे सभापती निवडीसाठी पेच निर्माण झाला होता. दरम्यान, आज कर्जत बाजार समितीच्या सभापतींची निवड होणार आहे. (Chairman of Karjat Bazar Committee will be elected today, Ram Shinde or Rohit Pawar will hold the power of Bazar Committee)
कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचीच्या मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत शिंदे आणि पवार यांच्या पॅनलला समान नऊ जागा मिळाल्या होत्या. स्पष्ट बहुमत कोणालाही मिळाले नव्हते. त्यानंतर अवघ्या दोन मतांनी पराभूत झालेले उमेदवार आणि भाजप पक्ष श्रेष्ठींना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळं आमदार राम शिंदे पॅनलचे उमेदवार भरत पावणे आणि महिला राखीव गटाच्या उमेदवार लीलावती जामदार यांनी निकालाला आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली. फेरमोजणी करूनही त्यात निकालात बदल झाला नाही. त्यामुळं रोहित पवार आणि राम शिंदे यांच्या गटाच्या प्रत्येकी नऊ जागा कायम राहिल्या आहेत.
दरम्यान, कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणूक होत आहे. समान मते पडल्यानंतर ईश्वरी चिठ्ठी टाकून निकाल ठरवण्याची पध्दत अवलंबली जाते. त्याद्वारे आलेला निकाल सर्वांनाच स्विकारावा लागतो. आता कर्जत बाजार समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया सुरू असताना त्या ठिकाणी फोडाफोडी होणार की, ईश्वरी चिठ्ठीने मतदान प्रक्रिया पार पडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मात्र राम शिंदे आणि रोहित पवार या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कर्जत बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक आज दुपारी होणार आहे. यापूर्वी जामखेड बाजार समितीत समसमान जागा निवडून आलेल्या असतांना, ईश्वरचिठ्ठी काढून राम शिंदे यांचा सभापती बसला होता. त्यामुळं आता रोहित पवार कर्जात बाजार समिती आपल्या हातात राखतात की, राम शिंदे बाजी मारतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.