Hasan Mushrif : छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो मुस्लिमांचा शत्रूच, औरंगजेबचे उदात्तीकरण करणं योग्य नाही

Hasan Mushrif  : छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो मुस्लिमांचा शत्रूच, औरंगजेबचे उदात्तीकरण करणं योग्य नाही

Hasan Mushrif on Aurangzeb : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) औरंगजेबचा (Aurangzeb) फोटो स्टेट्सला ठेवल्यानं चांगलचं वातावरण पेटलं आहे. राज्याच्या बहुतांश भागात सध्या तणावाचे वातावरण आहे. एका विशिष्ट समाजाकडून औरंजेबाचे उदात्तीकरण होत असल्याचं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांनी सांगितलं. तर आता राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू आहे तो भारतीय मुस्लिमांचा शत्रूच आहे. त्यामुळे औरंगजेबचा गौरव करता येणार नाही, असं परखड मत मांडलं. ( Hasan Mushrif said Chhatrapati Shivaji Maharajs enemy is our enemy, Aurangzeb cannot be ours;)

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी समनापूर, शेवगाव, अकोला या शहरात दंगली उसळल्या आहेत. त्यानंतर शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी कोल्हापूरमध्ये औरंगजेबचा फोटो स्टेट्सला ठेवल्यानं झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांचे स्वराज्य स्थापन केलं. औरंगजेब हा शिवरायांचा आणि बहुजन स्वराज्याचा शत्रूच होता. म्हणूनच औरंगजेब हा कधीच आपला होऊच शकत नाही, जो जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू आहे, तो भारतीय मुस्लिमांचा देखील शत्रूच आहे. त्यामुळे औरंगजेबाचा गौरव किंवा उदात्तीकरण करता येणार नाही, आणि ते करणं देखील योग्य नाही, असं मुश्रीफ म्हणाले.

‘राहुल गांधी दहशतवादी लादेनसारखी दाढी ठेवतात….’,भाजप नेत्याच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड

मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लीम समाजाविषयी कधीच द्वेष नव्हता. मुस्लिम समाजाचीही छत्रपती शिवाजी महाराजांवर तितकीच नितांत श्रद्धा होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात अनेक मुस्लिम सरदार, वतनदार आणि अन्य मुस्लीम चाकर होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापती दौलत खान, महाराजांना जीवाला जीव देणारा आणि त्यांच्यासाठी जीव धोक्यात घालणारा त्यांचा सर्वात विश्वासू आणि खास अंगरक्षक मदारी मेहतर हे मुस्लिमच होते. तसेच महाराजांकडे काझी हैदर, सिद्धी हिलाल, शामखान, नूरजा बेगम असे 22 सरदार होते, असं ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात इतके सगळे प्रमुख मुस्लिम असतील, तर त्या सैन्यात किती मुस्लिम मावळे असतील हेही लक्षात येते. 75 वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर भारतमाता हीच आमची माता आहे. या मातृभावनेमुळेच भारतीय मुस्लिम समाज या मातीत राहिला. सामाजिक द्वेषातून दंगधोपे आणि दंगली घडवणे हा काही लोकांचा अजेंडा आहे. या अजेंड्याला बळी पडू नका. मुस्लीम समाजाने आपल्या लहान, अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवून अशा त्यांच्या हातून अशी गोष्टी घडणार नाहीत याची काळजी घ्यावी, असेही मुश्रीफ म्हणाले.

ते म्हणाले, ‘धर्मातील तेढ वाढवून सामाजिक द्वेष निर्माण करण्याच्या हेतूने कोणी कितीही चिथावणी देऊ देत, भडकावणार्‍यांना बळी पडू नका. सावध राहा, दक्ष राहा, असे आवाहनही त्यांनी केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube