अहमदनगर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission)अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) ह्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. चाकणकर या 27 फेब्रुवारी रोजी नगर दौऱ्यावर येणार आहे. त्यांचा जिल्हा दौरा जारी झाला असून याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
असा असणार आहे दौरा
सोमवार दि.27 फेब्रुवारी, 2023 रोजी रात्री 8-00 वाजता पुणे शासकीय विश्रामगृह येथून अहमदनगर येथे आगमन व मुक्काम. मंगळवार दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11-00 ते दुपारी 1-30 वाजेपर्यंत अहमदनगर जनसुनावणी व आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे उपस्थित राहणार आहे.
Congress Session : काँग्रेसमध्ये आता फक्त डिजिटल सदस्यता, महिला-युवकांना 50 टक्के आरक्षण
दुपारी 1-30 ते 2-30 वाजेपर्यंतची वेळ राखीव. त्यानंतर दुपारी 2-30 वाजता पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 3-00 ते सायं. 6-00 वाजेपर्यंत शाळा, कॉलेज, भरोसा सेल,वनस्टॉप सेंटर, मुलींचे वसतिगृह, दामिनी पथक आदी ठिकाणी भेटी देणार आहे. त्यानंतर सायं 6-30 वाजता एका लग्नसोहळ्याला त्या उपस्थित राहणार असून त्यांनतर त्या बीडकडे रवाना होणार आहे.
kasba Bypoll : धंगेकरांच्या पायाखालची वाळू सरकलीय; भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका