Download App

आज तुमची वेळ, उद्या माझी येईल; पराभवानंतर चंद्रहार पाटील यांची भावनिक पोस्ट

सांगली लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचा मोठा पराभव झाला आहे. त्यानंतर उमेदवार चंद्रहार पाटील यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Image Credit: Letsupp

Chandrahar Patil : लोकसभा निवडणूक जाहीर झाली अन् एक वेगळा संघर्ष सुरू झाला तो सांगली लोकसभा मतदारसंघात. येथे महाविकास आघाडीमध्येच मोठा संघर्ष सुरू झाला. कारण, येथे पारंपारिक असलेली काँग्रेसची जागा शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केली. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद-प्रतिवाद सुरू झाले. (Chandrahar Patil) ज्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती त्या विषाल पाटील यांना न मिळता ती शिवसेनेकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना देण्यात आली. त्यानंतर ठाकरे यांनी ही उमेदवारी मागे घ्यावी यासाठी सर्वत्र प्रयत्न झाले. (Vishal Patil) मात्र, दोन्हीकडूनही उमेदवारी मागे घेतली नाही. अखेर विशाल पाटील विजयी झाले. (Sangli) त्यावर आता पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील यांनी एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

केवळ 60 हजार 860 मतं   Sangli Loksabha : सांगलीत आम्हीच किंग! विशाल पाटलांनी सिद्ध करुन दाखवलंच

‘या निवडणुकीत कुणाला दिलदार शत्रू मिळाले, तर कुणाला दिलदार मित्र मिळाले, पण माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करण्यासाठी सर्वच सहकारी मित्र, एकत्र आले आणि शत्रू म्हणून समोर उभे राहिले. पण वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची आहे, उद्या माझी येईल’ अशा आशयाची पोस्ट चंद्रहार पाटील यांनी शेअर केलीय. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या पोस्टमधून चंद्रहार पाटील यांचा नेमका रोख कुणावर? अशी सांगलीच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत चंद्रहार पाटील यांचं डिपॉझिट जप्त झाले असून, त्यांना केवळ 60 हजार 860 इतकी मते मिळाली आहेत.

61 टक्के मतदान झालं

सांगली लोकसभा मतदारसंघातील लढत यावेळी लक्षवेधी झाली. सर्व दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागली होती. सांगली लोकसभेसाठी यावेळी जवळपास 61 टक्के मतदान झालं होतं. त्यामध्ये खरी लढत ही अपक्ष विशाल पाटील आणि भाजपचे संजयकाका पाटील यांच्यात झाली. विविध एक्झिट पोलमध्येही विशाल पाटील हेच आघाडीवर असल्याचं सांगितलं गेलं. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रहार पाटलांना मदत न करता अपक्ष असलेल्या विशाल पाटलांना मदत केल्याचं उघड झालं आहे. खासकरून आमदार विश्वजीत कदम जरी महाविकास आघाडीच्या स्टेजवर दिसले तरी त्यांचा कल हा कुणाकडे होता हे उघड झालं. विश्वजीत कदमांची सर्व यंत्रणा ही विशाल पाटलांच्या मागे उभी राहिली आणि परिणामी विशाल पाटील यांचं पारडं जड झालं. त्यामुळं विशाल पाटील हे चांगल्या मताधिक्यानं निवडूणही आले आहेत.

२० पैकी १८ जणांना आपली अनामत जप्त

या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी ५ लाख ७१ हजार ६६६ मते घेउन विजय मिळवला. एकूण ११ लाख ६९ हजार ३२० मतदान झाले. यापैकी ४८.८९ टक्के मतं त्यांना मिळाली तर, भाजपचे पाटील यांना ४०.३३ टक्के मतदारांनी मत मिळाली आहेत. निवडणुकीत महाविकास आघाडीतून उभे असलेले उबाठा शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना ५.२० टक्के म्हणजेच फक्त ६० हजार ३६० मतदारांनी मत मिळली आहेत. बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश शेंडगे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती, त्यांना केवळ ८ हजार २५१ मते मिळाली. निवडणुकीत उतरलेल्या २० पैकी १८ जणांना आपली अनामत गमावावी लागली आहे.

follow us

वेब स्टोरीज