उद्धव ठाकरे यांनी 2019 साली भाजपसोबत विश्वासघात करत काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसल्यानेच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असल्याचा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. बावनकुळे आज अहमदनगरमध्ये छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
आंबेडकर-वागळे वादात हरी नरकेंची उडी, ‘ते स्वत:ला पुरोगाम्यांचे शंकराचार्य समजतात’
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, आम्हांला महाविकास आघाडी सरकार पाडण्यात काहीही रस नव्हता. पण ज्या पद्धतीने नैसर्गिक युती तोडून उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर बसले. त्यांनी भाजपचा विश्वासघात केला आहे. जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मान्यता देत ठाकरेंना कौल दिला होता. पण ठाकरेंनी विश्वासघात केल्यानं त्यांचं सरकार पडल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.
सारा अली खानचे स्टनिंग फोटोशूट
तसेच महाविकास आघाडीमध्ये असताना ज्या आमदारांना मुख्यमंत्री भेटत नव्हते, त्यांची कामे होत नव्हती. आपण पुढील निवडणुकीत पराभूत होऊ, असं वाटल्याने शिवसेनेचे 50 टक्के आमदार नाराज होते. त्यांना मातोश्री आणि मंत्रालयात प्रवेश दिला जात नव्हता, सत्तेपासून पैसा आणि पैशांतून सत्ता असा उद्योग सुरु होता, त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार पडल्याचं
चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या कुस्ती स्पर्धेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, शिवसेनेचे प्रमुख दिलीप सातपुते, अनिल शिंदे, अभय आगरकर यांसह भाजप-सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.