आंबेडकर-वागळे वादात हरी नरकेंची उडी, ‘ते स्वत:ला पुरोगाम्यांचे शंकराचार्य समजतात’

आंबेडकर-वागळे वादात हरी नरकेंची उडी, ‘ते स्वत:ला पुरोगाम्यांचे शंकराचार्य समजतात’

Hari Narke on Nikhil Wagle : गेल्या दोन दिवसांपासून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांच्यामध्ये सोशल वॉर सुरु होता. निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी सुजात यांना ‘थिल्लर’ म्हटले होते तर ‘तुमच्या पत्रकारीतेला सलाम’ असे उपरोधिकपणे सुजात आंबेडकर यांनी वागळेंना म्हटले होते. त्यांच्या या वादात ज्येष्ठ सामाजिक कार्यक्रते हरी नरके (Hari Narke) यांनी उडी घेतली आहे. ‘वागळे स्वत:ला पुरोगाम्यांचे शंकराचार्य समजतात’, असा टोला लागवला आहे.

निखिल वागळे आणि सुजात आंबेडकर यांच्यातील वादानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वागळेंना मोठे ट्रोल केले होते. यानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धोका असल्याची तक्रार वागळेंनी केली होती. याबाबत वागळे म्हणतात, 40 वर्ष चळवळीबरोबर घालवल्यावर, प्रत्यक्ष जात, धर्म सोडल्यावर केवळ जन्मावरुन ब्राम्हण म्हणून आरोप होणार असेल तर वेदना होतात. पण आता राग येत नाही. कीव येते हा आरोप करणाऱ्यांची. कारण आरोप करणारे अजून जातीच्या डबक्यातच आहेत, अशी टीका त्यांनी केली होती.

खारघर येथील मृत्यूला राज्य सरकार जबाबदार; मुंबईतून पवारांचा हल्लाबोल

वागळेंच्या टीकेला हरी नरके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणतात, निखिल वागळे उठसूठ दुसऱ्यांची जात काढतात. ते स्वत:ला पुरोगाम्यांचे शंकराचार्य समजतात. एकटा धुतल्या तांदळासारखा नी उरलेले सगळे जग, विशेषत: मागासवर्गीय नेते, कार्यकर्ते भ्रष्ट असल्याचे बेताल बडबडत असतात. वागळे हे निर्दय असून (2014 पासून कुंभकर्णी झोपेतल्या) गन्ना पगारे यांचे चाटुकार असलेले विश्र्वंभरी पत्रकार आहेत. वागळे हे कट्टर मंडल विरोधक. चॅनल हेड असताना बहुजन पत्रकारांची गळचेपी करणारे, जातीय कंपुशाही करणारे आणि दाखवायला आजूबाजूला एकदोन मागासवर्गीय ठेवणारे वागळे खरे रुप त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना विचारा.

स्वत:वर बेतले की ते सहानुभूतीसाठी कांगावा सुरू करतात. जात सोडल्याचा दावा करताना, तसा इतरांचा अनुभव असायला हवा. काय बोलता यापेक्षा कसे वागता हे आम्ही बघणार. त्यात वागळे कायम टोकाला जाणारे, दिखाऊ, सुपारीबाज पत्रकारिता करणारे.
वागळेसाहेब, तुम्ही जर खरंच जात सोडली असेल तर मग जी सोडली आहे तीच्यावरून हिनवल्याच्या वेदना का ब्रे व्हाव्यात? तेव्हा जात सोडली आहे की कवटाळलेली आहे याचे एकदा आत्मपरीक्षण कराच मालक! म्हणजे जात सोडल्याची जाहिरात अहोरात्र करताकरता स्वत:ला तिचीच नशा चढल्याचे तुमच्या लक्षात येईल. तुमच्यातला तुच्छतावाद टिपिकल उच्चजातीय आहे. तुम्ही उठताबसता चळवळीतील सगळ्यांचे ऑडिट करता ना? मग तुमचेही होणारच की! पेरावे तसेच उगवते, असे हरी नरके यांनी सुनावले आहे.

अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्यापूर्वी हे जरुर वाचा, ‘नाहीतर कराल पश्चाताप’

वागळे यांना त्यागाची अनावर नशा चढलेली आहे. जात सोडल्याची फक्त दवंडी पिटणारे, प्रत्यक्षात विक्षिप्त, माजूर्डे पत्रवीर आहेत निखिल वागळे. त्यांना मित्रांची किंवा चळवळीची कधीच किंमत नव्हती. उलट तेच त्यांचे सॉफ्ट टार्गेट होते. असते. त्यांच्यावर तुटून पडताना त्यांना कायमच चेव येतो. त्यांना 24×365 चळवळीतील दोस्तांवर संशय घेण्याचे भ्रमिष्टपण कधीतरी महागात पडणारच होते! बाजी उलटली की कांगावा सुरू हे नाटक आतातरी बंद करा वागळेसाहेब! जातीचे व्हिक्टिमकार्ड खेळणे हा तर फार केविलवाणा मार्ग झाला. मस्तवालपणा नडणारच, अशी टीका हरी नरके यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube