Download App

Radhakrishna Vikhe Patil यांना हादरे देण्यासाठी बाळासाहेब थोरातांना कोल्हे गटाची रसद

Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat :

राहाता तालुक्यातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महसूलमंत्री, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याविरोधात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balsaheb Thorat) यांनी पॅनेल दिला आहे. याच पॅनेलमध्ये कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा गट आहे. त्यामुळे विखेंना कोंडीत पकडण्यासाठी थोरात आणि कोल्हे एकत्र आले आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नऊ उमेदवार दिले आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीत जोरदार चुरस दिसणार आहे. (Congress Leader Balasaheb Thorat and Snehalata Kolhe together to defeat Radhakrishna Vikhe Patil in Ganesh Sahakari Factory elections)

सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. काहींनी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाले आहेत. थोरात व कोल्हे गटाने १९ उमेदवार रिंगणात उतरविले आहे. या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम कोते हेही आहेत. त्यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांची ताकद आहे. कोते हे थोरात यांचे भाचेही आहेत. त्यामुळे विखेंनी घेरण्यासाठी सर्वच एकत्र आले असल्याचे बोलले जात आहे. विखे गटाचे 19 तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 9 उमेदवार रिंगणात आहे. कारखान्याच्या १९ जागांसाठी ही निवडणूक १७ जून रोजी होत आहे.

‘डबल इंजिन सरकार बैलगाडीपेक्षा हळू; तेलपाणी करायला दिल्लीतील सर्व्हिसिंग स्टेशनला जावं लागते’

हा कारखाना स्थापन झाल्यापासून काही अपवाद वगळता विखे गटाची सत्ता राहिलेली आहे.या कारखान्याला मुबलक ऊस असताना हा कारखाना प्रचंड तोट्यात आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याकडे हा कारखाना गेल्या काही वर्षांपासून चालविण्यासाठी आहे. यंदाहा हा कारखाना विखेंनी चालविण्यासाठी घेतला आहे. त्यावरून बाळासाहेब थोरात यांनी विखेंवर निशाणा साधला आहे.

Gulabrao Patil : ‘…तर गुलाबराव पाटलांसह माझेही पाय कापतील’; शिंदेंच्या आमदाराचं खळबळजनक विधान

हा करार गणेशच्या मुदत संपलेल्या संचालक मंडळाकडून बेकायदेशीर पणे करून घेतल्याचा आरोप थोरातांनी केला आहे. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अॅड. अजित काळे यांनीही विखे विरोधात रणशिंग फुंकले आहे. काळे यांनी थेट कायदेशीर मार्ग वापरून कामगारांचे थकीत देणे देण्यास विखे कारखान्याच्या प्रशासनाला भाग पाडले आहे. त्यात आता कोल्हेही थोरातांच्या मदतीला आले आहेत.

कोपरगाव-शिर्डी विधानसभा क्षेत्रात कारखान्याचा प्रभाव

हा कारखाना राहाता तालुक्यातील गणेशनगर भागात आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र हे शिर्डी विधानसभा मतदारसंघात येते.तर काही भाग कोपरगाव तालुक्यात येतो. त्यामुळे राजकीय दृष्टा हा कारखाना महत्त्वाचा आहे. त्यामुळे विखे यांनी हा कारखाना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यात आता थेट कोल्हे गटही थोरात गटामध्ये आला आहे. तर अजित पवारांनी या कारखान्याकडे लक्ष घातल्याने कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनाही थोरात-कोल्हे गटाला मदत करावी लागणार आहे.

Tags

follow us