Gulabrao Patil : ‘…तर गुलाबराव पाटलांसह माझेही पाय कापतील’; शिंदेंच्या आमदाराचं खळबळजनक विधान

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (83)

Gulabrao Patil : शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटलांचा सोमवारी वाढदिवस होता. यानिमित्त जळगावात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. तर शिंदे गटाचे आमदार असेलेले किशोर पाटील यांनी देखील यावेळी भाषण केलं. या भाषणात त्यांनी एक खळबळजनक विधान केल्याचं पाहायला मिळालं. ( Shindes MLAs Sensational Statement on Gulabrao Patil )

राऊतांवर टीका करतांना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, एकेरी उल्लेख करत बाप काढला

या कार्यक्रमात भाषण करताना किशोर पाटील म्हणाले की, ‘गेल्या 20 ते 25 वर्षांपासून मी गुलाबराव पाटलांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतो. कारण आम्हीली शिवतिर्थानंतर कुठली पर्वणी असेल तर ती गुलाबरावांचा वाढदिवस. त्यामुळे 5 जून ही तारीख आमच्या मनात ठासून भरलेली आहे.’

Mahrashtra Congress : अशोक चव्हाणांनी थेट दिल्ली गाठली ! नाना पटोलेंचे पद जाणार ?

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, ‘मी भाऊ म्हणजे गुलाबरावांना ते जिल्हा प्रमुख, शिवसेनेटचे नेते, उपवनेते, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री झालेले आहेत. त्यांनी नेहनीच पुढीव वाटचालीसाठई मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मात्र आता कॅबिनेट मंत्रिपदानंतर मुख्यमंत्रीपद येत त्यासाठी शुभेच्छा देऊ शकत नाही. कारण मी मी त्यांचं मुख्यमंत्रिपद जाहीर केलं, तर तिकडून सगळ्यांकडून त्यांच्यासहित माझे पाय कापायला सुरुवात होईल.’

शिंदेंचे एकाच दगडात ‘दोन’ पक्षी; संपर्क अभियानातून पक्षाला ‘बूस्टर’ अन् ठाकरेंना देणार धक्का!

किशोर पाटील यांच्या या खळबळजनक विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून शिंदे गटामध्ये सार काही आलबेल नसल्याचं देखील या विधानावरून समजत आहे. या अगोदर देखील शिंदेंच्या काही आमदारांनी थेट आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर काही अशाप्रकारे शिंदे गट आणि भाजपचं वास्तव सांगणारे वक्तव्ये करत असतात.

दरम्यान गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ता धरणगाव तालुक्यातील पाळधी येथं काल रात्री आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलतांना पाटील म्हणाले की, सध्याचं राजकारण फार गढूळ झालं आहे. आता थुकायला लागतं ते बावळं, असं म्हणत राऊतांवर टीकास्त्र डागलं.

Tags

follow us