Download App

Nashik Graduate Constituency : ‘हे’ भाजप कार्यकर्ते कसे विसरणार, काँग्रेसचा पदाधिकारी संतापला

अहमदनगर : सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी देव असणाऱ्या नरेंद्र मोदींना काळं फासलंय, आता हे भाजप कार्यकर्ते कसे विसरणार आहेत? भाजप कार्यकर्त्यांसाठी मोदी मोठे की तांबे मोठे?, असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी केलाय. तसेच सत्यजित तांबे यांच्यावर टीकेची तोफ डागलीय.

दरम्यान, भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनाच निवडून आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आता सत्यजित तांबे यांच्या विजयासाठी कंबर कसली जात आहे. भाजप नेत्याच्या या आदेशानंतर किरण काळे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

किरण काळे यांनी नूकतीच काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठक घेऊन महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरु करण्याबाबतचे निर्देश दिलेत. काँग्रेसकडून अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त केल्यानंतर आता किरण काळे यांच्या हाती काँग्रेसची सुत्रे देण्यात आली आहेत.

आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षाच्यावतीने नसून स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर आहे. तांबे तरुण आणि आश्वासक आहेत. त्यांना संधी द्यावी, अशी आमची भावना असल्याचं भाजपचे मंत्री राधाकृष्ण यांनी स्पष्ट केलंय.

किरण काळे म्हणाले, सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाकडून नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार देण्यात आला नाही. सत्यजित तांबे आणि भाजपमध्ये निवडणूकीआधीच काहीतरी खलबतं सुरु असतील. त्याशिवाय मतदानाच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या नेत्यांकडून तांबे कसाकाय पाठिंबा दिला जातो.

तर दुसरीकडे कालपर्यंत मी काँग्रेसचाच उमेदवार म्हणवणाऱ्या सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा चालतोच कसा? सवालही त्यांनी केला असून मात्र, नाशिक मतदारसंघातील पदवीधर मतदार सुज्ञ आहेत. मतदारसंघातील मतदारांना सत्यजित तांबे किती खरे आणि किती खोटे बोलतात, हे आत समजंयल त्यांमुळे पदवीधर मतदार अशा गद्दारांनी मतदान करणार नसणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार सुरु असून शुभांगी पाटील यांचाच विजय होणार असून गद्दारांचा होणार नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलंय. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे फासणारा उमेदवार भाजपला चालतोच कसा? मोदींच्या तोंडाला काळं फासणाऱ्याचा प्रचार आता भाजपचे कार्येकर्ते करणार का? असा सवाल किरणे काळे यांनी केला आहे.

Tags

follow us