Siddheshwar Yatra Solapur : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या (Siddheshwar Maharaj) यात्रेला आता अवघे काही दिवस उरलेत. या यात्रेला जवळपास ९०० वर्षांची परंपरा आहे. या यात्रेला परराज्यातूनही भाविक येत असतात. सध्या यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, या यात्रेतील मुख्य विधी असलेल्या संमती पोथी वाचनाच्या मानावरून वाद तयार झाला आहे. सिध्देश्वर शेटे यांनी याबाबत न्यायालयात खटला दाखल केला आहे.
पवार कुटुंबात मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो : अजित पवारांनी ठणकावून सांगितले
श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेदरम्यान विविध प्रकारचे धार्मिक विधी होतात. असाच एक विधी म्हणजे संमती पोथी वाचन. गेल्या शंभर वर्षापासून संमती वाचण्याचा मान सुहास शेटे यांच्या कुटुंबाला आहे. यावर बोलतांना सोलापूरच्या शेटे कुटुंबातील सिद्धेश्वर शेटे यांनी सांगितले की, आमचे वंशज हे चालुक्य काळातील घराणे असून, माधवराव पेशवे यांनी त्यांना १७६८ मध्ये अणदूर येथून मंद्रूप भागासाठी वतनदार म्हणून नियुक्त केले होते. तेव्हा ग्रामदैवत असलेल्या सोलापूरच्या श्री सिद्धेश्वराच्या यात्रेदरम्यान संमती वाचण्याचा मान मिळाला. त्यांचे आजोबा गुरुसिद्धप्पा शेटे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात घरातील सदस्य लहान होते. त्यामुळे त्याला संमती पोथी वाचता आले नाही. ही परंपरा अखंड चालू राहावी म्हणून दुसऱ्या शेटे कुटुंबाला पोथी संमती वाचणासाठी दिली होती. परत देण्यच्या बोलीवर पोथी आणि मानाची पगडी दिली होती, असं सिध्देश्वर शेटे यांनी सांगितलं.
सिध्देश्वर शेटे पुढं बोलतांना म्हणाले की, अजूनही त्या कुटुंबातील सुहास शेटे यांनी आजतागायत पोथी परत केली नाही. आम्ही पेशवेकालीन वतनदार असून संमती पोथी वाचनाचा आमचा मान आहे. हा मान मिळण्यासाठी सोलापूर न्यायालयात दावा दाखल केला. आतापर्यंत सहा सुनावण्या झाल्या आहेत. अनेक ऐतिहासिक दस्तावेज आमच्याकडे असल्याचा दावा सिद्धेश्वर शेटे यांनी केला आहे.
दरम्यान, यंदा संमती पोथी वाचनाचा मान कोणाला मिळतो, हेच पाहणं महत्वाच आहे.