Download App

Deepali Sayyed : तुमची बग-बग थांबवा आता, संजय राऊतांना डिवचलं

अहमदनगर : जेवढी बग-बग करायची होती ती झालीय आता ही बग-बग थांबली पाहिजे, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. दीपाली सय्यद आज श्रीगोंद्यात आल्या होत्या.

Supriya Sule : …तर खासदार होण्याऐवजी मी राज्याची मुख्य सचिव झाली असते

यावेळी त्या बोलत होत्या. सय्यद यांनी साकळाई योजनेसाठी उपोषण केलं होतं. या योजनेच्या सर्वेला परवानगी मिळालीय. यावर सय्यद बोलत होत्या.

दीपाली सय्यद म्हणाल्या, संजय राऊत नूकतेच जेलमधून बाहेर आले आहेत. जेलमधून बाहेर आल्यानंतरही पुन्हा तेच करीत आहेत, कुठंतरी थांबा आता महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र या असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

India China Relations : सीमावादावर जयशंकर व चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग यांच्यात चर्चा

तसेच त्यांना जेवढी बग-बग करायची होती ती सगळी झालेली आहे, आचा ही बग-बग कुठेतरी थांबली पाहिजे. कारण आपल्या डोळ्यांसमोर सगळं काही तुटलेलं आपण पाहिलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. बग-बग करताना त्यांच्यामागे कोणी उभं पण नसतं असही त्या म्हंटल्या आहेत.

संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोर असं संबोधलं होतं. त्यानंतर विधीमंडळात सत्ताधारी नेत्यांकडून गदारोळ करण्यात आला होता. संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली. अखेर आजच्या आजच संजय राऊतांना कारणे दाखवा नोटीसला उत्तर देणं बंधनकारक असणार आहे.

हल्ल्यामागे कुणाचा हात, हे सगळ्यांनाच माहित; संदीप देशपांडेंचा रोख कुणाकडे ?

मागील अनेक वर्षांपासून साकळाई योजनेसाठी सर्वच लोक‌ प्रयत्नशील होते. त्या योजनेचं काम सुरू होतंय याचा आनंद होत आहे. यावेळी या योजनेच्या सर्व्हेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार सय्यद यांनी मानले आहेत.

दरम्यान, यावेळी दीपाली सय्यद यांनी अहमदनगरच्या लोकसभा उमेदवारीवरुही त्यांनी भाष्य केलं असून लवकरच नवा ट्विस्ट समोर येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us