Supriya Sule : …तर खासदार होण्याऐवजी मी राज्याची मुख्य सचिव झाली असते

  • Written By: Published:
Supriya Sule : …तर खासदार होण्याऐवजी मी राज्याची मुख्य सचिव झाली असते

“संसदेमध्ये बोलण्यासाठी मी आता खूप अभ्यास करते पण लहानपणी मला वाटायचं की इतका अभ्यास का करायचा? तर त्यावेळी इतका अभ्यास केला असता तर मी खासदार होण्याऐवजी राज्याची मुख्य सचिव किंवा एखाद्या कंपनीची सीईओ झाली असते” अस मत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. ‘खासदार आपल्या भेटीला’ उपक्रमाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणीसह विद्यार्थ्याच्या प्रश्रांना उत्तर दिली.

यावेळी सुळे यांनी पार्लमेंटमध्ये भाषण करताना काय काय तयारी करतात याची माहिती दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या की मी भाषण करताना पार्लमेटमधे आधी मी तयारी करून घेते, बोलण्यासाठी नोट्स काढते. बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी समोर सगळ्या नोट्स काढून ठेवते आणि सगळ्यात शेवटी केस व्यवस्थित करते कारण हे सगळे कॅमेरामधून समोर दिसत असते.

हेही वाचा : जाहिरातबाजी थांबवा, आजारी एसटीच्या दुरुस्तीचे पाहा; अजितदादांनी सरकारला खडसावले

संसदेत देशात पहिली कशी येते मलाही माहिती नाही

सात वर्षापासून सुप्रिया सुळे यांना संसदेमध्ये उत्कृष्ठ काम केल्याबद्दल सन्मान मिळतो आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणल्या की मी संसदेत देशात पहिली कशी येते मलाही माहिती नाही. त्या म्हणाल्या की मी शाळेत कॅालेजमधे कधीही पहीली आले नाही. पण संसदेत देशात पहिली कशी येते मलाही माहिती नाही. त्या पुढे म्हणाल्या की मी पंचवीस वर्षापूर्वी असते तर या रूममध्येही मी आले नसते. कारण मी विचार केला असता की मला काय करायचंय.. पण आता मी विचार करते की मला काय बोलायचंय काय नाही?

त्या पुढे म्हणाल्या की मला असं वाटतं की मी आता अभ्यास करण्याच्या ऐवजी जर शाळेत एवढा अभ्यास केला असता. तर त्यावेळी इतका अभ्यास केला असता तर मी खासदार होण्याऐवजी राज्याची मुख्य सचिव किंवा एखाद्या कंपनीची सीईओ झाली असते. असही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube