Download App

Ahmednagar : 25 वर्षांसाठी तयार होणार जिल्हा विकास आराखडा, नागरिकांकडून मागवल्या सूचना

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : जिल्हा प्रशासन पुढील २५ वर्षांचा जिल्हा विकास धोरणात्मक आराखडा (District Development Strategic Plan) तयार करणार आहे. हा आराखडा जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. त्या दृष्टीने ध्येय, उद्दिष्टे, धोरण आणि कृती आदी बाबींचा समावेश असेल. हा आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असं आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी केले आहे.

जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचा जिल्हा पातळीवर निर्णय झाल्यानंतर 20 सप्टेंबरपर्यंत नागरिकांकडून सुचना मागविण्यात आल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या या आव्हानाला सर्व क्षेत्रातून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, नागरिकाना सुचना पाठवण्यासाठी आता 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी लिखित स्वरुपात सूचना पाठवाव्यात असं जिल्हा प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

‘दिवाळीनंतर देशात कत्तल की रात’; प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने लक्ष वेधलं… 

यामध्ये प्रामुख्याने कृषी, पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यावरणीय बदल, पर्यटन, संस्कृती, जिल्हा विकास, रोजगार, शिक्षण,एमयाडीसी विकास, जीवनमान, डिजिटल कनेक्टिव्हिटी, विमानतळ, रेल्वे आणि रस्त्यांची उपलब्धता अशा विविध क्षेत्रांचा समावेश असणार आहे. तसेच बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि हवामानाच्या संदर्भात आपल्या जिल्ह्यातील संधी व जिल्ह्या समोरील आव्हाने या विषयावर आपले मत महत्वाचे आहे, असं सालीमठ यांनी सांगितलं.

धोरणात्मक आराखडयाचे यश सक्रिय लोकसहभाग आणि अभिप्रायावर अवलंबून आहे. तसेच सर्व भागधारकांच्या विशेषत: अहमदनगर जिल्हयाच्या नागरिकांच्या समस्या, आकांक्षा आणि गरजावर अवलंबून आहे, म्हणून जिल्हा विकासाच्या धोरणात्मक आराखड्यासाठी तुमचे मौल्यवान मते आणि सूचना सामायिक करण्यासाठी आमंत्रित करत आहेत. नागरिकांनी त्यांच्या सुचना 10 ऑक्टोबर, 2023 पर्यंत dsp.ahmednagar@gmail.com या ईमेल द्वारे लिखीत स्वरूपात पाठविण्यात याव्यात असेही आवाहन जिल्हाधिकारी, सिध्दाराम सालीमठ यांनी केले आहे.

Tags

follow us