‘दिवाळीनंतर देशात कत्तल की रात’; प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने लक्ष वेधलं…
Prakash Ambedkar : “दिवाळीनंतर देशात कत्तल की रात होणार” असल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रेसमध्ये वंचित बहुजन आघाडीही उतरणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता त्यांच्या या विधानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या विधानाचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीयं.
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुुरी, आता महिलांना मिळणार ३३ टक्के आरक्षण
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी आधीही सांगितल होतं, दिवाळीनंतर कत्तल की रात होणार आहे. सर्वत्र अराजकता माजलेली असणार आहे. देशात निवडणुकीच्या आधी जी परिस्थिती तशी याआधी कधीच झाली नाही. त्यामुळे तशी परिस्थिती निर्माण होणार असल्याचंही भाकीत प्रकाश आंबडेकरांनी केलं आहे.
तुमच्या खिशात असणाऱ्या दोन हजारांच्या नोटांबाबत RBI देणार ‘गुड न्यूज’
तसेच कितीही स्फोटक परिस्थिती असली तरीही मतदान होईपर्यंत सर्वांनी शांतता राखली पाहिजे,, मी आधीच सर्वांना शांत राहण्याचं आवाहन करीत आहे, सध्या राज्यात आरक्षणाची मागणी करणारेच आंदोलनं स्फोटक होत आहेत, त्यामुळे ‘कब है दिवाली’? असं म्हणायची वेळी आली असल्याचंही ते म्हणाले आहेत.
देशात एकीकडे सत्ताधारी भाजपला चीतपट करण्यासाठी विरोधकांची वज्रमूठ इंडिया आघाडी गठीत झाली. या आघाडीमध्ये भाजपविरोधातले देशातील सर्वच पक्ष सामिल झाले आहेत. तर भाजपसोबतही काँग्रेसविरोधातील गटतट भाजपसोबत सामिल आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका जवळच येऊन ठेपल्याने सर्वच नेत्यांकडून मतदारसंघात चाचपणी सुरु झाल्याचं दिसून येतयं.
Uddhav Thackeray : मोदी सरकारच्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या फुग्याला टाचणी; ठाकरे गटाचा हल्लाबोल
वंचित बहुजन आघाडीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत युती आहे. ठाकरे गटही भाजपविरोधातल्या इंडिया आघाडीचा प्रमुख घटक मानला जात आहे. तर आमची युती ही उद्धव ठाकरे गटासोबत आहे, मात्र, आम्ही महाविकास आघाडीचा घटक नाही. तसेच इंडिया आघाडीचाही घटक नसल्याचं वंचित बहुजन आघाडीने पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची बैठकीत मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकरांना देण्यात आलेलं नव्हतं. वंचितला निमंत्रण का नाही? याबाबत इंडिया आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. इंडिया आघाडीसाठी सामिल होण्याबाबतचं पत्रचं आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंना पाठवलं मात्र, अद्याप उत्तर न आल्याने आम्ही लोकसभेच्या 48 जागा लढवणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं आहे.