नाशिक: नाशिकमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आलीये. मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एकदा या महामार्गावर इगतपुरीजवळ असलेल्या पंढरपूरवाडीसमोर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. कारचालकाने अपघात टाळण्यासाठी कारचे अचानक ब्रेक दाबले. मात्र, का पूर्णत: अनियंत्रित झाल्याने कारचा भीषण अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत एकाच कुटूंबातील चार जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या भीषण आज सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ हा भीषण अपघात झाला आहे. नाशिककडून मुंबईच्या दिशेने एक चार चाकी गाडी जात होती. ही कार (MH 04 F 8291) भरघाव वेगाने जात असतांना कारचा पुढचा टायर फुटला. दरम्यान, कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट उडून डिव्हायडर क्रॉस करून विरुध्द बाजूला आली. या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील एका लहान मुलीसह एक महिला आणि दोन पुरूष ठार जागेवरच ठार झाले. त्यामुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत होते. दरम्यान, एक जण गंभीर जखमी झाले असून या जखमी असलेल्या अपघातग्रस्ताला एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं असून सध्या जखमीवर उपचार सुरू आहेत.
Modi 2024 Loksabha Elections : भाजपची नवी रणनीती, ‘मिशन 160’
हा अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला. रसत्यात सगळीकडे गाडीच्या काचा पसरल्या होत्या. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूकीचा बराच वेळ खोळंबा झाला होता. मात्र, अपघाताची माहिती मिळताच महामार्ग आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, वारंवार या मार्गावर अपघात होत असल्याने अपघात प्रवण क्षेत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.