Modi 2024 Loksabha Elections : भाजपची नवी रणनीती, ‘मिशन 160’

Modi 2024 Loksabha Elections : भाजपची नवी रणनीती, ‘मिशन 160’

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार तयारी सुरु असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. सलग तिसऱ्यांदा देशात सत्तेवर येण्यासाठी भाजपची नवी योजन तयार करण्यात आल्याचं दिसतंय. आगामी लोकसभेसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशभरातील 160 मतदारसंघात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली सुलोचनादीदींची चौकशी, उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून

लोकसभेसाठी सुरु असलेल्या या रॅलीला मिशन 160 लक्ष्यांवर असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. विरोधकांच्या पराभवासाठी भाजप आपली संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, केंद्रीय मंत्री अमित शहा, यांच्यासह इतर दिग्गज नेते कंबर कसणार आहेत.

ऑस्ट्रेलियात स्नेहल तरडेंची महिला दिनानिमित्त १५ हजार फुटांवरून उडी! व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या रॅलींद्वारे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतातील विशेषत: 160 मतदारसंघांमध्ये भाजपचा आवाका वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात येणार आहे. याशिवाय अनेक मोठे प्रकल्पही जाहीर केले जाणार आहेत. या रॅलींद्वारे महिला आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यावर भाजपचा भर असणार आहेत.

आर्थिक पाहणी अहवालावरून जयंत पाटलांनी राज्य सरकारवर डागली तोफ

दरम्यान, आगामी निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात आपले सरकार स्थापन करणार आहे. सध्या भारतीय जनता पक्ष दक्षिणेकडील राज्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

कारण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा घेता येईल. भारतीय जनता पक्ष 2024 च्या निवडणुकीसाठी तामिळनाडू आणि केरळवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube