ऑस्ट्रेलियात स्नेहल तरडेंची महिला दिनानिमित्त १५ हजार फुटांवरून उडी! व्हिडिओ व्हायरल

ऑस्ट्रेलियात स्नेहल तरडेंची महिला दिनानिमित्त १५ हजार फुटांवरून उडी! व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री या कायम आपल्या अभिनयासह अन्य काही आवडीच्या गोष्टी करतांना दिसत असतात. असंच काहीचं धाडसी पाऊल उचललं आहे मराठमोळी अभिनेत्री स्नेहल तरडेंनी! (Snehal Tarde) सध्या स्नेहल ह्या ऑस्ट्रेलियाची सफरीवर आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये त्यांनी स्काय डायव्हिंग (Sky diving) केलं आहे. त्यांच्या या स्काय डायव्हिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

जागतिक महिला दिनानिमित्त काहीतरी हटके करण्यासाठी स्नेहल ह्या आणि त्यांच्या मैत्रीणींनी सिंडनीत तब्बल १५ हजार फुटांवरून उडी मारत स्काय डायव्हिंग केले. त्यांच्यासह अनिता पाटील आणि रूपाली पवार या त्यांच्या मैत्रिणींनी देखील स्काय डायव्हिंगचा धाडसी प्रसंग अनुभवला. आम्ही आई जिजाऊच्या लेकी आहोत, १५ हजार फुटावरून काय, 30 हजार फुटावरूनही उडी मारू शकतो… मी उडी मारणार… जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र! असं म्हणत स्नेहल स्कायव्हिंगसाठी सज्ज झाल्या आणि तब्बल 15 फुटांवरून त्यांनी उडी मारली. या व्हिडिओत त्या स्काय डायव्हिंगचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. मनात कोणत्याही प्रकारची भीती न ठेवता त्यांनी बिनधास्तपणे उडी मारली अन् महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा केला.

स्नेहल तरडे यांनी अलीकडेच प्रदर्शित झालेल्या मुक्काम पोस्ट धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव या मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. त्यापूर्वी स्नेहल ह्या देऊळबंद, चिंडू 2, आणि व्हेंटिलेटर या चित्रपटातही झळकल्या होत्या.

शिवसेनेशी गद्दारी का केली? म्हणत खासदार धैर्यशील मानेंचा अडवला ताफा…

दरम्यान, स्नेहल यांचा हा व्हिडिओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी महिला दिनाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube