शिवसेनेशी गद्दारी का केली? म्हणत खासदार धैर्यशील मानेंचा अडवला ताफा…
कोल्हापूर : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आज खासदार धैर्यशील माने यांची गाडी अडवल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. यापुढे असा प्रकार झाल्यास ओरिजनल पद्धतीने उत्तर देण्यात येणार असल्याचा इशारा हातकणंगलेचे तालुकाध्यक्ष राहुल सावंत यांनी दिला आहे.
आर्थिक पाहणी अहवालावरून जयंत पाटलांनी राज्य सरकारवर डागली तोफ
खासदार माने यांचा ताफा अडविल्याच्या घटनेचा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या भाडोत्री लोकांकडून गाडी अडवण्याचा प्रकार हा भ्याड हल्ला असल्याचं राहुल सावंत म्हणाले आहेत.
नवीन पान सुपारी सम्राट कोण? हे महाराष्ट्राने ओळखावं, गजानन काळेंचा पवारांना टोला
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर व इचलकरंजीमधल्या सभेत खासदार माने यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर माने समर्थकांनी राऊत इचलकरंजीला जात असताना त्यांच्याविरोधात घोषणाबाजी, निदर्शने केली.
चौथ्या कसोटीत इशान किशन की केएस भरत नेमकं कोणाला मिळणार संधी ? राहुल द्रविडने दिला इशारा
त्यावर पलटवार म्हणून आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही खासदार धैर्यशील माने एका कार्यक्रमाला जात असताना त्यांचा ताफा अडवून शिवसेनेशी का गद्दारी केली? अशी विचारणा केलीय.
दरम्यान, खासदार माने आणि उद्धव ठाकरे गटात चांगलीच खडाजंगी रंगलीय. खासदार माने यांचा ताफा अडवताना ठाकरे-शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव दूर झाला आहे.