नवीन पान सुपारी सम्राट कोण? हे महाराष्ट्राने ओळखावं, गजानन काळेंचा पवारांना टोला
मुंबई : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला सरकारच बनवण्यासाठी पाठिंबा दिला म्हणे, पवार साहेब हे तो मुमकिन है. आता भारतीय जनता पक्षाची ध,ब,क,ड टीम ही राष्ट्रवादी पक्षाला म्हणावं का ? पहाटेच्या शपथ विधीला पवार साहेबांचा पाठिंबा होता. हे देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर शिक्कामोर्तब झाला आहे का ? महाराष्ट्रातला एक खूप मोठा नेता म्हणाला, आदरणीय पवार साहेब हे कायमच भारतीय जनता पक्षासोबत आहेत. आता हे नवीन पान सुपारी सम्राट कोण? हे महाराष्ट्र ने ओळखावं म्हणजे झालं. असा टोला मनसेचे नेते यांनी नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युती नंतर लगावला.
काही दिवसापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जातीवाद करतात असा आरोप केला होता तसेच राज ठाकरे म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीवाद जास्त प्रमाणात वाढला आहे. राज ठाकरे यांच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देत म्हंटलं होत की मनसे ही भाजपची बी टीम आहे.
Sharad Pawar : माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशीच आईने मला सभागृह दाखवलं!
आता नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युती झाल्यानंतर मनसे नेते गजानन काळे यांनी जयंत पाटील यांच्या त्या प्रत्युत्तराला टोला लगावत म्हंटले आहे की आता सांगा की भारतीय जनता पक्षाची ध,ब, क,ड टीम कोणती आहे. मनसे की राष्ट्रवादी तसेच काळे पुढे म्हणाले पहाटेच्या शपथ विधीला पवार साहेबांचा पाठिंबा होता. हे देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर शिक्कामोर्तब झाला आहे का ? महाराष्ट्रातला एक खूप मोठा नेता म्हणाला, आदरणीय पवार साहेब हे कायमच भारतीय जनता पक्षासोबत आहेत.
महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा..! अर्भक आणि माता मृत्यूदराने काळजीत वाढ
नागालॅंडमध्ये रिओ हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आणि भाजपच्या आघाडिला 60 पैकी 37 जागा मिळाल्या होत्या. त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधीदेखील झाला. 60 पैकी 7 जागा मिळवत राष्ट्रवादी हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. पण त्यानंतर राष्ट्रवादीने रिओ यांच्याशी असलेले संबंध आणि राज्याच्या हिताचा विचार करून भाजप, एनडीपीपीसोबत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसदेखील सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागालॅंडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी दिली.