Download App

पाथर्डी हादरले! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, एकजण ताब्यात

  • Written By: Last Updated:

पाथर्डी : माळीबाभुळगाव परिसरातील दीपक गोळक (Deepak Golak)यांच्या पोल्ट्री फार्मजवळील (Poultry Farm) विहिरीत चार मृतदेह (Four Dead) आढळून आले आहेत. पोल्ट्री फार्मवर कामासाठी आलेल्या कुटुंबातील एक महिलेसह तिचा मुलगा आणि दोन मुली असे चौघांचे मृतदेह विहिरीत सापडले आहेत. पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. मृत चौघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात  (Sub District Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (Fourteen dead bodies were found in the same family, the dead included three Lekaranchas, the police took the woman’s bottle into custody)

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गोळक यांचा माळीबाभुळगाव परिसरात फ्लाइंग बर्ड स्कूलच्या मागे पोल्ट्री फार्मचा व्यवसाय आहे. तेथे पाच कुटुंबे आणि इतर पाच लोक राहतात. त्यातील एक कुटुंब धम्मपाल सांगडे आणि त्याची पत्नी कांचन सांगडे, मुलगा निखिल सांगडे, मुली निशिधा आणि संचिता असे राहत होते. बुधवारी रात्री धम्मपाल सांगडे आणि त्यांची पत्नी कांचन यांच्यात वाद झाला. यावेळी इतर लोकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. झोपल्यानंतर पुन्हा धम्मपालचा पत्नीशी वाद झाल्याचे समजले. त्यानंतर सकाळी पोल्टीफार्मवर काम करणारा एकजण मोटार सुरू करण्यासाठी विहिरीवर गेला. तेव्हा निशिधा धम्मपाल सांगडे (वय दीड वर्ष) हीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. याची माहिती मिळताच पोल्ट्री फार्मचे मालक दीपक गोळक यांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, रामेश्वर कायंदे, सचिन लिमकर, सुरेश बाबर, कृष्णा बडे हे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत तीस ते पस्तीस फूट पाणी होते. विज पंपाच्या साहाय्याने विहीरीतील पाणी उपसले. तीन ते चार तास पाणी उपसल्यानंतर कांचन धम्मपाल सांगडे (२६), निखिल धम्मपाल सांगडे (६), संचिता धम्मपाल सांगडे (४) यांचे मृतदेह सापडले. कांचन आणि त्यांची तीन मुले विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी कांचन यांचा पती धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

भारत-अमेरिकेचं संविधान लोकशाहीवर आधारित, व्हाईट हाऊसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं संबोधित 

धम्मपाल सांगडे (वय-३० वर्षे) हा करोडी, ता. हदगाव, जिल्हा नांदेडचा रहिवासी आहे. तो त्याची पत्नी कांचन आणि एक मुलगा आणि दोन मुलींसोबत दीपक गोळक यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये मजूर म्हणून काम करत होता. धम्मपाल हा व्यसनी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. पोलिसांनी धम्मपालला ताब्यात घेतले आहे. मृत महिलेचे नातेवाईक आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

 

 

Tags

follow us