भारत-अमेरिकेचं संविधान लोकशाहीवर आधारित, व्हाईट हाऊसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं संबोधित
भारत-अमेरिकेचं संविधान हे लोकशाहीवर आधारित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या आमंत्रणानंतर मोदींचा हा आत्तापर्यंतचा सहावा दौरा आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेच्या संसंदेत भाषण करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर हाईट हाऊसमधून त्यांनी जनतेला संबोधित केलं आहे.
वयाच्या 36 व्या वर्षी तरुणासारखा जोश, अश्विनने हवेत झेप घेत पकडला झेल, पाहा व्हिडिओ
मी अनेकदा अमेरिकेत आलो आहे पण आज पहिल्यांदा भारतीयांसाठी हाईट हाऊसचे दरवाजे खुले झाले आहेत. भारतीय आपल्या कर्तुत्वाने अमेरिकेत भारताची शान वाढवत आहेत. सर्वजण आपली ताकद दाखवत आहेत. अमेरिकेने केलेल्या सन्मानाबद्दल जो बायडेन आणि जिल बायडेन यांचे आभार मानतो.
आधुनिक कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘आधारवड’ मराठी चित्रपट 23 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला
दोन्ही देशांचे संविधानाचे पहिले तीन शब्द ‘We The People’ असे आहेत. आपल्या विविधतेचा दोन्ही देशांना अभिमान आहे. कोरोना काळात भारत अमेरिकेचे संबंध जगभरातील सर्वच देशांचे संबंध वाढवण्यासाठी कटिबद्द आहेत. दोन्ही देश सोबत काम करण्यासही कटिबद्द असल्याचं ते म्हणाले आहेत.
तसेच 30 वर्षांपूर्वी मी अमेरिकेतलं व्हाईट हाऊस बाहेरुन पाहिलं होतं. त्यानंतर आज सर्व भारतीयांसाठी अमेरिकेतलं व्हाईट हाऊस खुलं झालं आहे. सर्वजण हिताय आणि सर्वजण सुखाय या तत्वावर आमचा विश्वास असून भारत-अमेरिकेचं संविधान लोकशाहीवर आधारित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच मला अमेरिकेच्या संसदेत बोलण्याची संधी दिल्याने भारताच्या तब्बल 140 कोटी जनतेचा सन्मान अमेरिकेकडून करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधा नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दोन्ही नेते एकत्र व्हाईट हाऊसमध्ये पाहायला मिळाले आहेत. शांती आणि स्थिरतेसाठी अमेरिकेसह भारत देश कटिबद्ध असून यासंदर्भात आमच्यात चर्चा सुरु असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेकडून करण्यात आल्याच्या सन्मानानंतर अमेरिकेचं आभारही मोदींनी मानले आहेत.
Mumbai Crime: मेकअप आर्टिस्ट सारा यंथनचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपात की आत्महत्या?
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये दाखल होताच पेन मसाला ग्रुपने व्हाईट हाऊसमध्ये विविध बॉलिवूड गाणी गायली आहेत. व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदी दाखल त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी व्हाइट हाऊसमध्ये स्टेट डिनरला हजेरी लावणार आहेत. स्टेट व्हिजिट हा अमेरिकेतील सर्वात वरच्या श्रेणीतील दौरा मानला जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या निमंत्रणानुसार हा दौरा संपन्न होत आहे. जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मोदी स्टेट व्हिजिट करणारे तिसरे नेते ठरले आहेत.