राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने हसम मुश्रीफ यांना काहीसा दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन दिवसांचा वेळ दिला होता. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पुढील सुनावणी होईपर्यंत अंमलबजावणी संचालयास (ED) मुश्रीफ यांना अटक करु नये, असे आदेश न्यायालयाने दिला आहे. येत्या २७ एप्रिलपर्यंत हा दिलासा आहे. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळलाहोता. मुंबई सेशन्स कोर्टाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारला होता.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत; फडणवीसाचं मोठं वक्तव्य
मागील काही महिन्यापासून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे सध्या ईडी (ED)च्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा छापेमारी केली. या छापेमारीतून ईडी अधिकारी त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची चर्चा आहे. तेव्हापासून त्यांना अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसापूर्वी ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण मुश्रीफांनी सुरवातीला चौकशीला जाणं टाळलं होतं. त्याऐवजी त्यांनी कोर्टाची पायरी चढत अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी पावलं उचलली. पण सेशन्स कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. पण सेशन्स कोर्टाच्या या निकालानंतर आता हसन मुश्रीफ मुंबई हायकोर्टात जातात का? चौकशीला सामोरं जातात, हे पाहावं लागेल.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत; फडणवीसाचं मोठं वक्तव्य
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात अनेक फसवणुकीचे तसेच घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्ज प्रकरणात ईडी सध्या मुश्रीफ व त्यांच्या कुटुबीयांची चौकशी करत आहे. अनेकदा ईडीकडून त्यांच्या निवास्थानी छापेमारी झाली आहे. मुश्रीफांविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.