Download App

कोण शरद पवार? मी ओळखत नाही, केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा

Union Minister Ajay Kumar Mishra on Sharad Pawar : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार टीका केली होती. मी अजय कुमार मिश्रा यांना ओळखत नाही असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या टीकेला मंत्री मिश्रा यांनी प्रत्युत्तर दिले असून शरद पवारांना मी सुद्धा ओळखत नाही. कोण शरद पवार? 5 ते 6 खासदार असणाऱ्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही. पवारांनी माझ्या मतदार संघात येऊन एकदा स्वत: निवडणूक लढत दाखवावी, असे थेट आव्हान मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी दिले आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की शरद पवारांना वाटत असेल की मी एक नेता आहे. आम्ही सुद्धा एका क्षेत्राचे नेते आहोत. शरद पवारांना वाटत असेल तर त्यांनी आमच्या मतदार संघात येऊन निवडणूक लढवून दाखवावी, असे प्रतिआव्हान मिश्रा यांनी केले आहे.

Sharad Pawar : शरद पवारांनी संभाजीनगर असा उल्लेख केला तरी भाजपने फेक ट्विट केलं

साताऱ्यात भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी थेट खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहावे लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारचे अनेक मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहेत. भाजपकडून पश्चिम महाराष्ट्रावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रत्येक महिन्याला महाराष्ट्राचा एक दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी विशेष लक्ष वाढवले आहे.

Tags

follow us