Download App

पैसा लग्नावर नाही, शिक्षणावर खर्च करा; माझं लग्न फक्त ५० रुपयांत झालं; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितला किस्सा

  • Written By: Last Updated:

Sushil Kumar Shinde : सध्या देशात महागाई गगनाला भिडली आहे. ऐन सनासुदीच्या दिवसांत महागाईने कहर केल्यानं नागरिक चांगलेच हैरान झालेत. दरम्यान, या वाढत्या महागाईवर भाष्य करतांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी आपल्या लग्नाचा किस्साच एका कार्यक्रमात ऐकवला. माझं लग्न 1970 मध्ये झाले होते, लग्न केवळ पन्नास रुपयांत झालं होतं. लग्नावर अवाढव्य खर्च करण्याऐवजी तोच पैसा शिक्षणासह इतर महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करावा, असं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं.

सोलापुरात शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या लग्नाचा किस्सा सांगितला. मुस्लिम समाजातील 151 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलतांना त्यांनी शिक्षकांचे कौतुक केलं. ते म्हणाले, एक नवा समाज बनवण्यासाठी तुमचं योगदान, तुमची ताकद महत्वाचं आहे. कुठल्याही देशाच्या जडणघडणीत त्या देशातील शिक्षकांचं योगदान फार महत्वाचं असतं. आतापर्यंत ज्या पध्दतीने तुम्ही पिढ्या घडवण्याचं कामं केलं, तसंच काम यापुढेही कराल, असा विश्वास व्यक्त करत पुरस्कार प्राप्त शिक्षकांचं अभिनंदन केलं.

छेडछाडीत मुलीचा मृत्यू : आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न; उत्तरप्रदेश पोलिसांनी थेट गोळ्याच झाडल्या 

ते म्हणाले, समाजाला जे पटेल, तसं आपण करतो. बऱ्याचदा पैसा अडका नसतांनाही लग्नांवर वारेमाप खर्च केला जातो. मात्र, लग्न समारंभात अवाढव्य खर्च करणं टाळलं पाहिजे. ते म्हणाले की, माझं लग्न फक्त पन्नास रुपयांत झालं. माझ्या लग्नाला जास्त लोकही नव्हते. मी, माझी बायको आणि आमचीकाही मित्रमंडळीच लग्नाला हजर होती. लग्नात खानवळीवरही जास्त खर्च करायला नको. लग्नाला जास्त खर्च नाही व्हायला पाहिजे. जे पैसे लग्नावर खर्च होतात, ते पैसे तुम्ही मेडिकल, मुला-बाळांचं शिक्षण यावर केला पाहिजे, असं सांगत त्यांनी वाढत्या महागाईवर भाष्य केलं.

 

 

 

Tags

follow us