छेडछाडीत मुलीचा मृत्यू : आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न; उत्तरप्रदेश पोलिसांनी थेट गोळ्याच झाडल्या

छेडछाडीत मुलीचा मृत्यू : आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न; उत्तरप्रदेश पोलिसांनी थेट गोळ्याच झाडल्या

Crime : आंबेडकरनगर : उत्तरप्रदेशच्या आंबेडकरनगरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या आणि तिला जीवानीशी मारणाऱ्या तीन गुंडांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र वैद्यकीय तपासणीदरम्यान, पोलिसांची बंदूक घेऊन पळून जाणाच्या प्रयत्नात असताना झालेल्या चकमकीत हे तिन्ही गुंड जखमी झाले आहेत. यात दोघांच्या पायाला गोळी लागली तर तिसऱ्याचा पाय मोडला आहे. (Uttar Pradesh police fired on escape attempt of the accused in the crime of molesting the girl)

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार (15 सप्टेंबर) बारावीमध्ये शिकणारी एक मुलगी मैत्रिणींसोबत सायकलीवरुन शाळेतून घरी येत होती. वाटेत येताना शाहबाज, फैजल आणि तिसरा मुलगा यांनी संबंधित मुलीची छेड काढली आणि तिचा स्कार्फ ओढला. मात्र हिसका बसल्याने ती मुलगी सायकलीवरुन खाली पडली आणि फैजलने तिच्या अंगावर गाडी घातली, यात तिचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यीनीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली होती.

POCSO कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल

या घटनेबाबत बोलताना आंबेडकरनगरचे अधिक्षक अजित सिन्हा यांनी सांगितले की, या घटनेतील आरोपी शाहबाज आणि फैसल यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेले जात असताना त्यांनी पोलिसांची बंदूक हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत त्यांच्या पायाला गोळी लागली. तर तिसऱ्या आरोपीचा पाय मोडला आहे. या तिघांवरही भारतीय दंड संहितेच्या कलम 302 सोबतच पॉक्सो कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हंसवर पोलीस स्टेशन प्रभारींना निलंबित केले आहे.

‘सनातन’च्या वादात पडू नका’; BJP चा प्लॅन लक्षात येताच राहुल गांधींचा नेत्यांना अलर्ट

दरम्यान, मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, ती जीवशास्त्राची विद्यार्थिनी होती, अभ्यासात चांगली होती आणि तिला डॉक्टर बनायचे होते. त्यांनी आठवड्याभरापूर्वी पोलिसांकडे या गुंडांविरोधात कारवाई करण्यासाठी तोंडी तक्रार केली होती, परंतु पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही, त्यावेळी कारवाई केली असती तर आज त्यांची मुलगी जिवंत असती. 8 वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झाले होते, अभ्यासासोबतच त्यांची मुलगी घरातील कामही करायची.

PM Narendra Modi B’day : पंचाहात्तरीच्या उंबरठ्यावर पोहचलेले मोदी राजकारणातून निवृत्त होणार?

तर मृत विद्यार्थिनीच्या मित्राने सांगितले की, शाहबाज, फैसल आणि आणखी एक मुलगा तिचा पाठलाग करत होते. यापूर्वीही त्यांनी अनेकदा तिचा पाठलाग केला होता. शुक्रवारी त्यांनी तिचा स्कार्फ ओढल्याने ती सायकलवरून पडली. फैसलने मागून तिच्या अंगावर गाडी चालवली. मी तिथे पोहोचेपर्यंत तिच्या तोंडातून रक्त येत होते, ती काहीच बोलू शकली नाही, रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube