Download App

नगरमध्ये शाळेच्या परिसरातच मटक्याचा अड्डा! काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या स्टिंग ऑपरेशन नंतर पोलिसांची कारवाई

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : शहरात अनेक ठिकाणी मटका  (Matka Adda) खेळल्या जातो. मात्र, जिल्हा पोलीस प्रशासनाचा याकडे कानाडोळा झाला आहे. त्यामुळं शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातही मटका अड्डा चालवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह मध्य शहरातील मार्कंडेय विद्यालय (Markandeya Vidyalaya) व प्रगत विद्यालयाजवळी मटका अड्ड्याचे स्वतः वेशांतर करत फेसबूक लाईव्हव्दारे स्टिंग ऑपरेशन केले.

Farzi 2 : पुन्हा एकदा बनावट नोटांचा कारखाना? फर्जी 2 साठी शाहीद कपूर सज्ज

शाळेलगतच मटका अड्डा असल्यानं अनेक शाळकरी मुलं मटका अड्ड्याच्या चक्रात अडकण्याची शक्यता आहे. मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी शहरातील सर्वांनीच हेरंब कुलकर्णी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काळे यांनी केले. यावेळी काळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी “मी हेरंब कुलकर्णी” असे लिहिलेल्या टोप्या परिधान करत मुलांचे भवितव्य खराब करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या पोलीस व मनपा प्रशासनाचा निषेध केला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर शाळेच्या परिसरातील अवैध धंद्यांच्या टपऱ्या हटवण्याच्या तक्रारीवरून भ्याड हल्ला झाला होता. त्यानंतर काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह त्यांची बुधवारी भेट घेऊन विचारपूस केली. त्यानतंर गुरुवारी दुपारी हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले.

यावेळी मार्कंडेय शाळेच्या प्रवेशद्वारापासून मटक्याच्या टपरीपर्यंतचे अंतर टेपने मोजले असता ते केवळ ३० मीटर भरले. केंद्र शासनाच्या २००३ च्या कायद्यानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या २०११ च्या जीआर नुसार कोणत्याही शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारापासून शंभर मीटरच्या आतमध्ये अवैध धंद्यांना अटकाव करण्यात आला आहे.

हे अंतर मोजल्या नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांना रेड टाकण्याची मागणी काळेंनी केली. उपनिरीक्षक पाटील यांच्या पथकाने काही वेळाने छापा टाकला. पोलीसांनी आरोपींना अटक करत मुद्देमाल जप्त केला. मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना देखील तातडीने सदर मटक्याच्या अतिक्रमित टपरीवर कारवाई करण्यचाी मागणी केली.

Tags

follow us