Farzi 2 : पुन्हा एकदा बनावट नोटांचा कारखाना? फर्जी 2 साठी शाहीद कपूर सज्ज

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 13T160618.151

Farzi 2 : फर्जी या वेब सिरीजने ओटीटीवर धुमाकुळ घातल्यानंतर आता फर्जी 2 (Farzi 2) देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं वक्तव्य अभिनेता शाहीद कपूर याने एका मुलाखतीत केलं आहे. त्यामुळे आता चाहत्यांना फर्जी 2 वेब सिरीजची उत्सुकता लागली आहे. कारण फर्जी वेब सिरीज देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर आता फर्जी 2 कडून देखील त्यांच्या आपेक्षा आहेत.

फर्जी 2 साठी शाहीद कपूर सज्ज?

फर्जीचा पहिला सीजन प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतला होता. त्यावेळी एका नोटवर ती सिरीज संपली होती. त्यानंतर आता आगामी भागात चाहत्यांना पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे. साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती यांनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. तर शाहीद ने नोटांच्या स्मगलरची भूमिका साकारली होती.

Sunil Tatkare यांची स्फोटक मुलाखत…

ही सिरीज शाहीदसाठी खास होती कारण त्याने या सिरीजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू केला होता. प्रेक्षकांसह या सिरीजला समीक्षकांनी देखईल नावाजलं होतं. ही सिरीज राज आणि डीके यांनी दिग्दर्शित केली होती. तर शाहीद कपूर, विजय सेतुपती यांच्यासह के के मेनन, राशि खन्ना आणि भुवन अरोरा यांनी दमदार भूमिका निभावल्या होत्या.

आढळरावांनी साधलं टायमिंग ! शिरुर मतदारसंघातील प्रश्नांसाठी उद्योगमंत्र्यांच्या दरबारी

दरम्यान शाहीद कपूर सध्या अली अब्बास जफर यांचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ब्लडी डॅडमध्ये दिसला होता. ज्यामध्ये संजय कपूर, डायना पेंटी, रोनीत रॉय, राजीव खंडेलवाल, अंकूर भाटीया आणि विवान भटेना हे देखील होते. तर लवकरच शाहीद कृती सेननसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. मा६ या चित्रपटाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 ला रिलीज होणार आहे.

Tags

follow us