आढळरावांनी साधलं टायमिंग ! शिरुर मतदारसंघातील प्रश्नांसाठी उद्योगमंत्र्यांच्या दरबारी

  • Written By: Published:
आढळरावांनी साधलं टायमिंग ! शिरुर मतदारसंघातील प्रश्नांसाठी उद्योगमंत्र्यांच्या दरबारी

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्यादृष्टीने सर्वच पक्ष लागले आहेत. आता इच्छुक उमेदवारही मतदारसंघातील प्रश्न घेऊन मंत्र्यांच्या दारी जात आहेत. असेच टायमिंग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalero Patil) यांनी साधले आहे. शिरुर लोकसभा (Shirur Loksabha) शेतकऱ्यांचे, उद्योजकांचे, नगरपरिषदेचे व ग्रामपंचायतींचे प्रश्न त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यासमोर मांडले आहे. उद्योगमंत्र्यांनीही लगेच शिरुर लोकसभा मतदारसंघातील की कामे प्राधान्याने सोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत तज्ञ डॉक्टरांच्या 21 जागांची भरती, या तारखेपर्यंत करा अर्ज

केंद्र शासनाच्या धोरणाअंतर्गत खेड सेझ (SEZ) करिता 2500 हेक्टर क्षेत्र संपादित झाले. मात्र पुढे सेझ प्रकल्प रद्द झाला. बाधित शेतकऱ्यांचे 15 टक्के परतावा क्षेत्र एमआयडीसीच्या माध्यमातून केईआयपीएल व केडीसी कंपनीकडे वर्ग करण्यात आले. पण परताव्याची जमीन एमआयडीसीच्या माध्यमातून व रेडीरेकर दरानुसार विक्री व्हावी, ही बाधित शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याबाबत शेतकरी हिताचे निर्णय प्राधान्याने घ्यावेत, अशी मागणी आहे. तर चाकण शहर पाणीपुरवठा योजनेकरिता पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाची खुली जागा खास बाब म्हणून निःशुल्क अथवा नाममात्र भाडेपट्टयाने चाकण नगरपरिषदेस मिळावी.

शिरुर तालुक्यातील कारेगाव, ढोकसांगवी व रांजणगाव ग्रामपंचायतीकडून गोळा केल्या जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट एईपीएल कंपनीकडून लावण्यात यावीत, अशी मागणी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. त्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील ही कामे प्राधान्याने सोडविण्याचे आदेश उपस्थित एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. बैठकीस माजी खासदार आढळराव पाटील यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, संबंधित गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

NCP : ‘त्या’ घटनेचा मी स्वतः साक्षीदार’; शरद पवारांचं नाव घेत तटकरेंनी फोडलं मोठं गुपित!

शिरुरमधून आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांनी पराभूत केले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारी आहेत. त्यामुळे आतापासून आढळराव पाटील यांनी मतदारसंघातून तयारी सुरू केली केली आहे. मतदारसंघातील प्रश्न ते सरकार दरबारी मांडून सोडून घेत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube