NCP : ‘त्या’ घटनेचा मी स्वतः साक्षीदार’; शरद पवारांचं नाव घेत तटकरेंनी फोडलं मोठं गुपित!

NCP : ‘त्या’ घटनेचा मी स्वतः साक्षीदार’; शरद पवारांचं नाव घेत तटकरेंनी फोडलं मोठं गुपित!

NCP : अजित पवारांचा गट भाजपासोबत जाऊन आता (NCP) तीन महिने उलटून गेले आहेत. आता अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्याबरोबर गेलेले आमदार सरकारमध्ये स्थिरावले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) पक्षबांधणीसाठी राज्याचे दौरे करत आहेत. राष्ट्रवादीवरील दाव्याचा वादही (NCP Crisis) निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. अशा परिस्थितीतही राष्ट्रवादीतील फुटीच्या चर्चा अजूनही थांबलेल्या नाहीत. अजित पवार भाजपसोबत का गेले?, शरद पवारांना या घडामोडींची माहिती होती का? महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि राष्ट्रवादीही भाजपबरोबर जाईल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. प्रत्यक्षात हे घडलं नाही मात्र त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? याची माहिती अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली. लेट्सअप मराठीच्या लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात खासदार तटकरे यांनी अनेक मुद्द्यांवर सडेतोड मते व्यक्त केली.

शरद पवार यांना त्यांच्या जवळची माणसं सोडून गेल्यानंतर त्यांच्याप्रती लोकांची सहानुभूती वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. या मुद्द्यावर तटकरे म्हणाले, ‘ज्यावेळी एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यावेळीच स्पष्ट झालं होतं की आता महाविकास आघाडीचं सरकार राहणार नाही. मग त्यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांनी पवार साहेबांना पत्र दिलं होतं, की आम्हाला या सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे. भाजप-शिंदेंच्या सरकारमध्ये सहभागी व्हावं असं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शंभर टक्के सांगितलं होतं. रोहित पवारांनीही याला कधी नकार दिला नाही.’

वंचितला इंडियात सहभागी करणार का? शरद पवार स्पष्टच म्हणाले, ‘आंबेडकरांना इंडिया आघाडीत…’

‘ज्यावेळी हा मुद्दा मांडला गेला त्यावेळी कुणीच म्हटलं नाही की त्या पत्रावर माझी सही नाही. म्हणजेच, याचा अर्थ सरळ आहे. ते सत्यच आहे. कारण त्यावेळी सही होत असलेल्या क्षणाचा मी साक्षीदार आहे. मी त्या बैठकीत होतो. पण, आम्ही तो राजकीय निर्णय घेतला होता हे नक्की’, असे तटकरे म्हणाले.

‘ज्यावेळी आपण राजकारणात असतो. त्यावेळी काही ध्येय धोरणे असतात. त्यामुळे सहाजिकच टीका टिप्पणी होत असते. देशाच्या राजकारणात आघाडी सरकारची अपरिहार्यता 1989 पासून सुरू झाली. विरोधात लढलेले पक्षही अनेक वेळेला एकत्र येतात. राजकारणात अनेकदा त्या-त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहून भूमिका घ्यावी लागते. आता आम्ही राज्यात जी भूमिका घेतली ती सत्तेसाठी घेतलेली नाही तर राज्याच्या विकासासाठी घेतली. अजित पवार यांच्या नेतृत्वात लोकशाही मानणाऱ्या आमच्या पक्षाने बहुमताने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.’

माझ्या सगळ्या निवडणुका शिवसेनेविरोधातच

‘2014 ला ज्यावेळी आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा दिला त्यावेळी ही विरोधाची धार हळूहळू बोथट होत गेली. 2014 च्या निवडणुकीचे निकाल हाती येण्याआधीच आम्ही पाठिंबा दिला होता. 2017 मध्ये सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न केला होता. 2019 मध्ये जनतेचा कौल युतीला स्पष्टपणे मिळालेला होता. 180 चं संख्याबळ होतं. पण, मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात वाद झाले. मग, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. आम्ही फक्त भाजपच्याच विरोधात भाषणं केली असं नव्हे तर आम्ही शिवेसेनेशीही लढत आलो. माझ्या कोकणात तर माझ्या सगळ्या निवडणुका या शिवसेनेच्या विरोधातच लढल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्याविरोधातही आमची भाषणं झाली. त्यावेळी हे प्रश्न कुणी विचारले नाहीत पण, आता आमच्यावर प्रेम असलेल्यांना आम्ही घेतलेली भूमिका पटत नाही तेच लोक अशी टीका करतात.’

Sharad Pawar : पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे सावध होत फडणवीसांनी शिवसेनेला… छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

जयंत पाटील तुमच्यासोबत कधी येणार?

‘जयंतराव राज्याच्या राजकारणातले मॅच्यूअर लिडर आहेत. दीर्घकाळ ते राजकारणात काम करत आहेत. त्यांच्या पोटातलं पाणी हलत नाही पण, डोळ्यांतलं पाणी टिकत नाही अशी त्यांची ख्याती आहे. करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जातं. त्यामुळे ते कधी काय कुठे हे माझ्यापेक्षा तेच चांगल्या पद्धतीने सांगू शकतील.’ ‘त्यांना इनव्हिटेशन कशाला? अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्यांनी जी भूमिका घेतली आहे. निर्णय घेतला आहे. त्या निर्णयासोबत सगळ्यांनी यावं अशी माझी सर्वांनाच विनंती आहे’, असे जयंत पाटील तुमच्यासोबत येणार का, या प्रश्नाच्या उत्तरात तटकरे यांनी सांगितले.

पडळकरांना फटकारलं

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचाही तटकरेंनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘काही व्यक्ती अशा असतात ज्यांची मानसिक ठेवण एका विकृत मनोवृत्तीवर आधारित असते. टीका करताना काही माणसं भान सोडून टीका करतात त्यातले गोपीचंद पडळकर एक आहेत. या प्रकरणात तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळसरळ माफी मागितली. राजकारणात असे प्रसंग घडतात पण व्यापक विचार करून त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. पण त्या प्रकरणात पक्षाची जी भूमिका होती ती कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दाखवून दिली. त्याची भाजपनेही दखल घेतली. असे प्रसंग काँग्रेसबरोबर असतानाही आले होते.’

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube