बीडमध्ये ५१९ पैकी ४३९ परवानाधारकांकडून शस्त्र जमा, काय आहे कारण?
बीडमध्ये बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर येथे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी सध्या निवडणूक होत आहे.
बीड जिल्ह्यातील नऊ पोलीस ठाण्यांतर्गत होत असलेल्या (Beed) नगराध्यक्ष व प्रभागांमधील नगरसेवक पदासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ५१९ परवानाधारकांपैकी ४३९ जणांनी शस्त्र जमा करण्यात आले आहेत. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
बीडमध्ये बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर येथे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी निवडणूक होत आहे. या अंतर्गत नऊ पोलीस ठाणी असून, त्या अंतर्गत ५१९ शस्त्र परवानाधारक आहेत. त्यातील ४१९ जणांनी शस्त्रे जमा केली आहेत. बीड जिल्ह्यात गतवर्षी एका आंदोलनातील हिंसाचार, विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन परवानाधारक बंदुकीचे सर्वाधिक प्रस्ताव दाखल झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी २७४ प्रस्ताव फेटाळले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर १ हजार २७८ परवानाधारक शस्त्रांपैकी दोन परवान्यांची वाढ झाली होती, अशी माहिती यापूर्वी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली होती.
बीडमधील धक्कादायक घोटाळा! भूसंपादनात २४१ कोटींचा घोळ, दहा जणांविरोधात गुन्हा
कार्यालयातील गृह विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या दरम्यान, शस्त्र परवानाधारकांची संख्या एक हजार २७८, तर विधानसभेची आचारसंहिता लागू होईपर्यंतच्या कालावधीच्या टप्प्यावर एक हजार २८० एवढी होती. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, बीड जिल्हा अनेक वादाच्या प्रसंगाने चर्चेत आला होता. मतमोजणीच्या वेळी, रात्री निकाल जाहीर करण्याच्या वेळेलाही बराच खल झालेला होता. या पार्श्वभूमीवर शस्त्र परवाना मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २७४ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. मात्र, लोकसभेपर्यंत ६६० शस्त्र परवानाधारक होते.
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ही संख्या १३० ने घटून ५३० पर्यंत आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली होती. शस्त्र परवाना कायद्यानुसार शुल्क २,१०० रुपये आहे. २०१६ पासून हे शुल्क वाढविण्यात आलेले नाही. काही मतदारसंघात मतदानादिवशी व मतमोजणी दिवशीही डोक्याला पिस्तूल लावल्याची चर्चा होती. आता बीड जिल्ह्यात नगरपालिकांची निवडणूक सुमारे १० वर्षांनी होत आहे. या पार्श्वभूमीवर शस्त्रपरवानाधारकांनी त्यांच्याकडील शस्त्र जमा केले आहेत.
