वंचितला ‘इंडिया’त सहभागी करणार का? शरद पवार स्पष्टच म्हणाले, ‘आंबेडकरांना इंडिया आघाडीत…’

  • Written By: Published:
वंचितला ‘इंडिया’त सहभागी करणार का? शरद पवार स्पष्टच म्हणाले, ‘आंबेडकरांना इंडिया आघाडीत…’

Sharad Pawar on Prakash Ambedkar : आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी भाजपविरोधी (BJP) पक्षांची मोट बांधून इंडिया (INDIA) आघाडीची स्थापना केली. अनेक विरोधी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले. मात्र, प्रकाश आंबेडकरांचा वंचित बुहजन आघाडी अद्याप इंडियात सहभागी झाली नाही. दरम्यान, वंचित इंडियात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं. प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) इंडिया आघाडीत घेण्यासाठी सकारात्मक असल्याचं ते म्हणाले.

TYFC Collection : प्रेक्षकांना भावला नाही ‘थॅंक यू फॉर कमिंग’; जाणून घ्या कमाई 

वंचित इडिया आघाडीत सहभागी होणार की नाही, यावरून सतत चर्चा होत असतात. मात्र, याबद्दल अधिकृतपणे कोणीच बोलत नाही. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना वंचितला इंडिया आघाडीत सहभागी करणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, आमची कुणाची त्यांच्याशी याविषयावर चर्चा झाली नाही. पण, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली आहे. मात्र, समान कार्यक्रमावर भाजपविरोधातील ज्या शक्ती एकत्र येऊ शकतील. यामध्ये यापूर्वी काय झालं, याचा विचार न करता त्यांना सहभागी करावं, असं माझं अर्थात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचं धोरण आहे, असं पवार म्हणआले.

ते म्हणाले, आंबेडकरांना इंडिया आघाडीत घ्यावं, हे माझं मत आहे. पण प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. आघाडीतील इतर लोकांनाही विश्वासात घ्यावे लागेल, असे पवार म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी उशीर का होतोय, यावर शरद पवार म्हणाले, की आमची बैठक झाली नाही. इंडियाची बैठक होणार आहे. मुंबईला बैठक झाली त्यानंतर नागपूर किंवा इतर कुठं बैठक होणार याबाबत आमची चर्चा सुरू आहे. त्या बैठकीत वंचितबाबत चर्चा होईल. पण, इंडियाच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर असतील का हे आत्ताच सांगू शकत नाही.

प्रकाश आंबेडकर तुमच्यावर आरोप करतात, असं विचारलं असता पवारांनी सांगितल की, त्यांचे आरोप हे काही आमच्यासाठी नवीन नाहीत. त्यांना सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडी निर्णय घेईल, असं पवार म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैर यांनीही वंचित बाबत मोठं विधान केलं होतं. वंचितची आमच्यासोबत युती म्हणजेच महाविकास आघाडीसोबत आहे. इंडिया आघाडीत लवकरच प्रकाश आंबेडकर सामील होतील, असं वक्तव्य त्यांनी केल होतं. तर आता शरद पवारांनीही आंबेडकरांना आघाडीत घेण्यासाठी सकारात्मकता दर्शवली. त्यामुळं आता प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत सहभागी होणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube