Download App

‘फिरोदिया शिवाजीयन्स’चे नगर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण केंद्र

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : नगरमध्ये फुटबॉल खेळाला चालना देण्याबरोबरच गुणी खेळाडू हेरून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स क्लब (Firodia Shivajians Club) सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. आता नगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण मिळण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स क्लबने नगर कॉलेजमध्ये फुटबॉल प्रशिक्षण केंद्र (Football Training Center) सुरू केले आहे. नगर कॉलेजमध्ये या प्रशिक्षण केंद्राचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला.

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा मुक्काम तुरुंगातच! अजितदादांनी कुटुंबियांना भेट नाकारली 

यावेळी बोलतांना नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, नगर शहरासह जिल्ह्यात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र नगर कॉलेजच्या मैदानावर सुरू केले जात आहे. याठिकाणी नामांकित प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच विविध स्पर्धांमध्ये खेळाडूंना सहभागी केले जाईल. फिरोदिया शिवाजीयन्स क्लब अनेक वर्षांपासून नगरमध्ये सर्वोत्तम फुटबॉलपटू घडविण्यासाठी विविध स्पर्धा, प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येत आहेत. आता कायमस्वरुपी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत असल्याने खेळाडूंना चांगली सुविधा उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगिलतं.

याप्रसंगी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल ट्रस्ट तथा अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, नगर कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस, उपप्राचार्य डॉ. नोएल पारगे, डॉ. प्रीतम बेदरकर, समन्वयक डॉ. रजाक सय्यद, फिजिकल डायरेक्टर डॉ. सेवियो विगस आदी उपस्थित होते.

दरम्यान, शिवाजीयन्स क्लबने पुढाकार घेऊन फुटबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यानं आता नगरमधील खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण मिळणार आहे. शिवाजीयन्स क्लबचे नगरच्या क्रीडाविश्वातून कौतूक केलं जातं आहे.

Tags

follow us