Download App

Jayant Patil : राष्ट्रवादी फोडण्याचा एका पक्षाचा ‘बीआरएस’ला आदेश; जयंत पाटलांचा निशाण्यावर भाजप ?

Jayant Patil : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता शरद पवार (Sharad Pawar) यांना साथ देण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी शरद पवार यांच्या बाजूने आहेत त्यांची मतं कापायला. काँग्रेसचं कुणी फुटलेलं नाही. पण जेवढी राष्ट्रवादी काँग्रेस फोडता येतील तेवढी फोडा असं दुसऱ्या पक्षानं सांगितलेलं होतं. तो दुसरा पक्ष त्यांना म्हणत होता की महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मतं कापा. पण ज्यावेळी एनसीपीच तुटली त्यावेळी बीआरएसची (BRS) डिमांड कमी झाली. आता पक्षच फुटला म्हटल्यानंतर यांना कोण विचारतं, म्हणून बीआरएसची किंमत कमी झाली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. तसं पाहिलं तर त्यांनी आपल्या भाषणात दुसऱ्या पक्षाचं नाव घेतलं नाही पण त्यांचा रोख भाजपवरच होता हे काही लपून राहिलेलं नाही.

Jayant Patil : फडणवीसांकडे अजितदादांचा फोन नंबर नाही? जयंंत पाटलांनी टाकली गुगली

सांगली येथील माहेश्वरी भवन येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत जयंत पाटील बोलत होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राज्य निरीक्षक समन्वयक शेखर माने, राहुल पवार, धनपाल खोत, शेडजी मोहिते, हरिदास पाटील, विजय घाडगे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकांचा उल्लेख करत ज्याप्रकारे तिथे काँग्रेसने विजय मिळवला तशाच पद्धतीने पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन काम करावे, असे आवाहन केले.

पाटील यांनी यावेळी भारत राष्ट्र समितीवर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले, सांगली शहरातील जनता विकासाला साथ देते. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इकडे तिकडे गेलेल्या लोकांची काळजी करू नये. लोकांपर्यंत पोहोचा. वॉर्ड आणि बूथ कमिट्या मजबूत करा, अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. प्रयत्नांची पराकष्टा केली की विजय निश्चित होतो, हे तेलंगणा राज्याच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. विरोधी बीआरएसकडे प्रचंड ताकद होती, मात्र काँग्रेसच्या रेवंत रेड्डी यांनी कष्ट व मेहनत घेत जनतेचा विश्वास जिंकला. त्याच धर्तीवर कार्यकर्त्यांनी काम करणे आवश्यक आहे. बीआरएसने महाराष्ट्रात देखील अनेक सभा मेळावे घेतले. राष्ट्रवादीमधील बरीच मंडळी त्यांनी घेतली. पण आता ते परतत असल्याचे त्यांनी सांगितले.

Jayant Patil : मुख्यमंत्रिपद जाणार म्हणून शिंदेंचं कुणी ऐकत नाही; जयंत पाटलांनी सांगितली ‘अंदर की बात’ 

Tags

follow us