Telangana : आधी पती, नंतर भाऊ गमावला! नक्षलवादी ते मंत्रिपदाची शपथ; सीताक्कांचा प्रवास

Telangana : आधी पती, नंतर भाऊ गमावला! नक्षलवादी ते मंत्रिपदाची शपथ; सीताक्कांचा प्रवास

Seethakka : तेलंगणाच्या नवीन अनुमुला रेवंथ रेड्डी (Ravant Reddy) सरकारमध्ये दोन महिला आमदारांना मंत्री करण्यात आले आहे. मुलुगमधून निवडून आलेल्या सीताक्का (Seethakka) यांनी शपथ घेतल्यानंतर तेलंगणाच्या जनतेत एकच खळबळ उडालीयं. सीताक्का यांच्या जीवानाचा प्रवास एखाद्या चित्रपटाला लाजवेल असाच काहीसा आहे. आज रेवंथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी दुपारी गोपनीयतेची शपथ दिली. यासोबतच अन्य 11 नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यातील एक मंत्री सीताक्का आहेत, त्यांच्या प्रवासाविषयी थोडक्यात जाणून घेऊयात…

भाजप आमदाराचं IAS परीशी जुळलं सुत! लाखोंचं वऱ्हाड अन् तीन ठिकाणी रिसेप्शन

सीताक्का यांचं 1988 मध्ये दहावीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नक्षलवाद्यांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सीताक्का नक्षलवाद्यांमध्ये सामील झाल्या होत्या. नक्षलवाद्यांसोबत काम करताना त्यांना नक्षली गटाच्या कमांडर बनवण्यात आलं होतं. दरम्यान, नक्षलवादात सहभागी असलेला त्यांचा भाऊ आणि पती पोलीस चकमकीत मरण पावला. पती आणि भाऊ मरण पावल्यानंतर अखेर चंद्राबाबू सरकारमध्ये त्यांनी मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला.

Nagpur : स्वतःची झोळी रिकामी अन् शिंदेंच्या शिलेदारांची ठाकरेंच्या आमदाराला मंत्रिपदाची ऑफर

आत्मसमर्पण केल्यानंतर सीताक्का जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या उन्नतीसाठी काम करू लागल्या. हळूहळू त्या आदिवासी भागात लोकप्रिय झाल्या. त्यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा तेलगू देसम पार्टी (टीडीपी) कडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्या पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेल्या. मुलुग मतदारसंघातून त्या पहिल्यांदाच निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचल्या. मात्र, तेलंगणाच्या स्थापनेनंतर त्यांनी टीडीपीचा निरोप घेतला आणि रेवंथ रेड्डी यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Tripti Dimri : ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या रिलीजनंतर प्रकाशझोतात आलेली तृप्ती डिमरी आहे तरी कोण?

निवडणुकीत हॅट्ट्रिक :
तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आदिवासी नेत्या सीताक्का यांचेही नाव होते. आज त्यांनी तेलंगण मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. मुलुग मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या दानसारी अनुसया ऊर्फ सिताक्का यांनी 33,700 मतांनी विजय मिळवून हॅट्ट्रिक केली आहे.

ICC T20 Rankings : ICC च्या 12 पैकी 8 रॅकिंग्समध्ये भारताचा दबदबा; रवि बिश्नोई बनला नवा बॉस

सार्वजनिक जीवनात व्यस्त असूनही त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. 2022 मध्ये, त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्रात पीएचडी पदवी मिळवली. सीताक्का यांच्याकडे 82 लाखांची संपत्ती आहे. त्यापैकी 1 लाख रुपये रोख आहेत. यासोबतच 3 लाख रुपयांचे 60 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube