Download App

Jayant Patil : शिंदे-फडणवीसांची घाबरगुंडी उडाली, निवडणूक घेण्याची हिंमत नाही

अहमदनगर : ओढून-ताणून आलेलं शिंदे-फडणवीस सरकार राज्याच्या जनतेला अजिबात रुचलेलं नाही. त्यामुळं जनतेच्या मनात माेठा राेष निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Sthanik Swarajya Sanstha) निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मुळातच आगामी काेणत्याही निवडणुका घेण्यासाठी सरकारची घाबरगुंडी उडाली असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. आगामी काळात हाेणाऱ्या लाेकसभा-विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकत्र लढल्यास आघाडीला माेठं यश मिळेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

सावता परिषदेंतर्गत माळी समाजाच्या प्रश्नांवर मंथन करण्यासाठी अहमदनगरधील नंदनवन लाॅन येथे ५ वे त्रेवार्षिक अधिवेशन झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले, ‘राज्याच्या जडणघडणीत माळी समाजाचे याेगदान माेठे आहे. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी, ही माळी समाजाची मागणी आहे. हा प्रश्न महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर धसाला लावण्याचे काम राष्ट्रवादी पक्ष करेल, असे अश्वासन त्यांनी दिले.

संपत्ती वादावर अभिनेता नवाजुद्दीनने उचलले मोठे पाऊल, कोट्यवधींची जमीन…

कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीसंदर्भात सरकार थातूर-मातूर उत्तरे देत आहे. समिती नेमण्याचं आश्वासन दिलं. परंतु, समिती नेमेपर्यंत सामान्य शेतकरी कांदा हा विकेल कारण त्याला दुसरा पर्याय नसताे. त्यामुळं ताे कांदा व्यापाऱ्याकडे जावून व्यापाराचं हित संवर्धन करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचं सरकार करीत आहे, अशी टीकाही पाटील त्यांनी केली.

Tags

follow us