Download App

आता भाजपने सातारा लोकसभेवरून अजितदादांना कोंडीत पकडले ! जागा सोडण्यास उघड विरोध

  • Written By: Last Updated:

Jaykumar Gore On Ajit Pawar: साताराः लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष मतदारसंघावर दावा सांगू लागले आहेत. महाविकास आघाडी असो की महायुतीतील पक्ष हे जागांवर दावा सांगतायत. त्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) चार लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यात भाजपकडे असलेल्या सातारा मतदारसंघाचा (Satara Loksabha) समावेश आहे. ही जागा अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला सोडण्यास आता भाजपकडून उघड विरोध सुरू झाला आहे. भाजपचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी थेट पत्रकार परिषद घेत ही जागा सोडणार नसल्याची भूमिका जाहीर केलीय. कुठल्याही परिस्थिती सातारा लोकसभा मतदारसंघ भारतीय पक्ष सोडणार नाही, अशी ठाम भूमिका गोरे यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटामध्ये या जागेवर जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘मराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन’; जाळपोळनंतर प्रकाश सोळंकेंनी दिला शब्द

जयकुमार गोरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभेच्या विषयावर काही चर्चा केली आहे. सातारा लोकसभा आम्ही लढवू अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे, असे माझे मत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप लढवेल. भाजपने त्यांच्याशी कोणतेही अधिकृत चर्चा केल्याचे माझ्या कानावर आलेले नाही. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजपने जिल्हामध्ये काम गेले आहे. आज जिल्ह्यात भाजप एक नंबरचा पक्ष आहे. वाई, सातारा, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण या सगळ्या भागात भाजपचे प्राबल्य आहे. त्यामुळे कोण काय भूमिका मांडते, त्यावर वरिष्ठ पातळीवरील नेते चर्चा करतील. जवळजवळ तीन-चार वर्षांपासून आम्ही लोकसभेची तयारी केलेली आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजपचा खासदार होण्यास कोणतेही अडचण नाही, असे आमचे मत आहे.

भुजबळ पिऊन बोलतात काय? मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा खोचक टोला

हा मतदारसंघ कुठल्याही किंमतीवर भाजपकडे राहिला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. पक्षश्रेष्ठींकडे आम्ही भूमिका मांडली आहे. वरच्यास्तरावर कुठलीच चर्चा झाल्याची मला माहिती नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. परंतु आमचा आग्रह आहे. कुठल्याही परिस्थिती सातारा लोकसभा मतदारसंघ भारतीय पक्ष सोडणार नाही.

गोरेंनी अजित पवारांना डिवचले !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यात प्रबळ होता. याबाबत शंका नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता राष्ट्रवादी प्रबळ कुठे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा विषय बाजूला ठेवूया. भाजपची ताकद असून, भाजप सक्षम पक्ष आहे. भाजपच हा मतदारसंघ लढणार आहे. भाजपचा एकमेव पर्याय असल्याचे गोरे यांनी म्हटले आहे.

Tags

follow us