Download App

अजितदादा शब्दाचे पक्के! अडीच महिन्यांनंतर कोल्हापूरला मिळाले नवीन आयुक्त

अखेर कोल्हापूर महापालिकेला नवीन आयुक्त मिळाले आहेत. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूरच्या आयक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आज त्यांचा बदली आदेश जारी झाली. दरम्यान के. मुंजलक्ष्मी यांच्या नियुक्तीनंतर उपमुख्यमंत्री अजिद पवार शब्दाचे पक्के असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

Lok Sabha Elections ; ‘आघाडीचा बसपाला नेहमीच तोटाच’, मायावतींनी दिला स्वबळाचा नारा

अडीच महिन्यांपूर्वी तत्कालीन आयुक्त कांदबरी बलकवडे यांची पुण्यात बदली करण्यात आली. त्यानंतर मागील अडीच महिन्यांपासून कोल्हापूर महानगरपालिकेचं आयुक्तपद रिक्त होतं.

Sukhee: शिल्पा शेट्टीच्या ‘सुखी’चा पोस्टर रिलीज! 22 सप्टेंबरला प्रदर्शित होणार चित्रपट

त्यात महापालिकेची मुदत संपल्याने शहराच्या विकासाला खो बसला होता. त्यामुळे शहरातील वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत होतं. अनेक लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष वेधले होते.

त्यानंतर 15 ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना आठवड्याभरात आयुक्त देणार असल्याचा शब्द दिला होता. त्यानंतर आता आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. आता अखेर के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या (बुधवार) दिनांक २३ ऑगस्ट रोजी त्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

Tags

follow us