दुष्काळामुळे नुकसान झालेल्या उसांचेही पंचनामे होणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

Ahilyanagar Sugarcane Crop Damage Panchnama; नेवासा तालुक्यात दुष्काळामुळे नुकसान झालेल्या ऊस पिकाचेही पंचनामे होणार आहेत.

Ahilyanagar Sugarcane Crop Damage Panchnama

Ahilyanagar Sugarcane Crop Damage Panchnama: अहिल्यानगर : नेवासा तालुक्यात दुष्काळामुळे उसाची वाढ खुंटली असून त्याचा उत्पादनावरही परिणाम झाला आहे. या नुकसानीची दखल घेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी ऊस पिकाचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील (Vitthalrao Langhe Patil) यांनी यासाठी मागणी केली होती.

मोठी बातमी: पुण्यात नवीन मेडीकल कॉलेज होणार; MBBS च्या 50 जागांवर प्रवेश, फडणवीसांची घोषणा!

पाण्याअभावी उसाच्या उत्पादनात घट

नेवासा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि पावसात मोठा खंड पडल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. पाणी न मिळाल्याने उसाची वाढ खुंटली असून कांड्यांची लांबी आणि जाडी कमी झाली आहे. ऊस बारीक पडणे, वजन घटणे आणि एकरी उत्पादन कमी होणे, अशा समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

आमदारांच्या मागणीची दखल

केवळ पूर्णपणे वाळलेल्या उसाचेच पंचनामे न करता, पाण्याअभावी वाढ खुंटलेल्या आणि उत्पादनक्षमता घटलेल्या उसाच्या नुकसानीचीही नोंद घ्यावी, अशी मागणी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या उपस्थितीत यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.

अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; रिलायन्स पॉवरची 2,032 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

या मागणीची दखल घेत कृषिमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ऊस नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. नुकसानग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे पंचनाम्यांची प्रक्रिया आणि त्यानंतरच्या मदतीबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

follow us