कर्जतमध्ये सभापती-उपसभापतीही ईश्वर चिठ्ठीने ठरणार ? फेर मतमोजणीत काय झाले ?

Rohit Pawar Vs Ram Shinde : जामखेड-कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष झाला. त्यात मतदारांनाही दोन्ही गटाचे समसमान नऊ संचालक निवडून दिले आहे. जामखेडचे सभापती-उपसभापती हे ईश्वर चिठ्ठीने ठरले आहे. सभापती शिंदे गटाला, तर उपसभापती पवार गटाचा झाला आहे. कर्जतमध्ये शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी फेर मतमोजणीची […]

Ram Shinde Rohit Pawar

Ram Shinde Rohit Pawar

Rohit Pawar Vs Ram Shinde : जामखेड-कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष झाला. त्यात मतदारांनाही दोन्ही गटाचे समसमान नऊ संचालक निवडून दिले आहे. जामखेडचे सभापती-उपसभापती हे ईश्वर चिठ्ठीने ठरले आहे. सभापती शिंदे गटाला, तर उपसभापती पवार गटाचा झाला आहे. कर्जतमध्ये शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली. परंतु या मतमोजणीत काही फरक झाला नाही. त्यामुळे आता सभापती-उपसभापती निवडीकडे लक्ष लागले आहे. जामखेडप्रमाणेच कर्जतला सभापती-उपसभापती निवड ईश्वर चिठ्ठीने होण्याची शक्यता आहे.

जयंत पाटलांबरोबर नेते का नाहीत? रोहित पवारांनी सांगितलं कारण

कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष फोडला होता. त्यानंतर जोरदार राजकारण झाले. पण या ठिकाणी दोन्ही गटाचे सम-समान नऊ संचालक निवडून आले. त्यानंतर राम शिंदे गटाचे सेवा सोसायटी गटातील उमेदवार भरत पावणे, लिलावती जामदार या दोघांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा उपनिबंधकांनी दोघांचे अर्ज मंजूर केले. त्यानंतर 22 मे रोजी मतमोजणी ठेवण्यात आली होती.

अजित पवारांचं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं मान्य, म्हणाले…

या मतमोजणीसाठी दोन्ही गटाचे समर्थक आले होते. तर पोलिस बंदोबस्तात मतमोजणी झाली. त्यात मोठा बदल झाला. उलट अर्ज करणाऱ्यांचे एक-एक मत कमी झाले आहे. जामदार या तीन मतांनी, तर पावणे हे अवघ्या चार मतांनी पराभूत झाले आहे. त्यामुळे आता येथील सभापती-उपसभापती निवडीकडे लक्ष लागले आहे. जामखेडमध्ये दोन्ही गटाचे संचालक फुटले नव्हते. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीवर पदाधिकारी निवडले गेले आहे. त्याच पद्धतीने कर्जतमध्येही सभापती-उपसभापती निवड होण्याची शक्यता आहे.

या फेर मतमोजणीनंतर आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.प्रशासनाला हाताशी धरून राम शिंदे यांनी फेर मतमोजणी घडवून आणली आहे. तरीही काही बदल झाला नाही. राम शिंदे रडीचा डाव खेळत असल्याची टीकाही रोहित पवारांनी केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=P_ptExEjNM4

Exit mobile version