Download App

मी PMO कार्यालयाची राष्ट्रीय सल्लागार…सव्वा कोटींना गंडा, ‘घोटाळ’झेप घेणारी साताऱ्याची कश्मिरा पवार कोण?

पंतप्रधान कार्यालयाची राष्ट्रीय सल्लागार असल्याचा बनाव करीत साताऱ्याच्या कश्मिरा पवार हिने सव्वा कोटींना गंडा घातल्याचं समोर आलयं.

Kashmira Pawar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendr Modi) यांच्या कार्यालयाची सल्लागार असल्याचा बनाव करत अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलायं. या प्रकरणी साताऱ्यातील प्रियकर आणि प्रेयसीला पोलिसांकडून अटक करण्यात आलीयं. साताऱ्यातील 29 वर्षीय कश्मिरा पवार (Kashmira Pawar) आणि सहआरोपी 32 वर्षीय गणेश गायकवाडला (Ganesh Gaikwad) अटक करण्यात आलीयं. पंतप्रधान कार्यालयासह आमचा थेट अजित डोवाल यांच्याशीच संपर्क असल्याचाही बनाव दोघांकडून करण्यात आलायं. एका वृत्तसंस्थेकडून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलीयं.

वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नका; थेट लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस

कश्मिराचा बनाव उघड कसा झाला?
काही वर्षांपूर्वी साताऱ्यातील 29 वर्षीय तरुणी कश्मिरा पवार हिने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेत यश मिळवल्याचं सांगण्यात आलं होतं. एवढचं नाही तर पंतप्रधान मोदी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपली पंतप्रधान कार्यालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती केली असल्याचंही या तरुणीने अनेक मुलाखतींमध्ये स्पष्ट केलं होतं. आता हा सर्वच बनाव असल्याचं उघड झालंय. या तरुणीविरोधात पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्याने पोलिसांनी अटक केलीयं.

पोलिसांकडे आत्तापर्यंत फसवणूक केल्याप्रकरणी तीन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. एकंदरीत या तक्रारदारांची तरुणीने तब्बल 82 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीयं. तक्रारदारीवरुन पोलिसांनी फसवणुकीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करुन तरुणीला अटक केलीयं.

शिंदे सरकारच्या अडचणीत होणार वाढ? 127 मतदारसंघात मनोज जरांगेंचे सर्व्हे पूर्ण

सरकारी टेंडरचं अमिष…
कश्मिरा पवार हिने पुण्यातील बंड गार्डन परिसरातील गोरख मरळ यांनाही 50 लाख रुपयांना गंडा घातलायं. तुम्हाला सरकारी टेंडर मिळवून देते, असं अमिष दाखवून तरुणीने त्यांच्याकडून 50 लाख रुपये घेतले. त्यानंतर हॉट्सअपवर टेंडरची बनावट कागदपत्रे पाठवले. मरळ आणि पवार यांच्यातील हा व्यवहारर डिसेंबर 2019 ते 2022 या काळात ऑनलाईन आणि काही रोख स्वरुपात झालं असल्याचं तक्रारीत सांगितलंय. कश्मिरा आणि गणेश यांनी मागील सहा वर्षांपूर्वीच्या बातम्यांचा दाखला देत विश्वास संपादन करुन ही फसवणूक केलीयं. कश्मिराने मरळ यांना एक पत्र पाठवलं त्यामध्ये पंतप्रधान मोदींची सही होती. त्यामध्ये आपली पंतप्रधानांची सल्लागारपदी नियुक्ती झाल्याचं लिहिलं होतं. तर गणेश गायकवाड यांनीही थेट रॉमधील अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचं सांगितलं. हा संपूर्ण घोटाळा लक्षात येताच मरळ यांनी पैसे मागितले तर कश्मिराने मरळ यांच्याच विरोधात खंडणीची तक्रार दाखल केल्याचं मरळ यांनी वृत्तसंस्थेला सांगितलंय.

व्हीव्हीआयपी असल्याचा कश्मिरा अन् गणेशचा बनाव…
सातारा पोलिसांच्या माहितीनूसार कश्मिरा आणि गणेश हे एखाद्या व्हीव्हीआयपी व्यक्तीप्रमाणेच वावर करत असायचे. ज्या लोकांची त्यांनी फसवणूक केलीयं, त्यांच्यासोबत व्हीव्हीआयपी असल्याचं वावरत असल्यानेच त्यांच्यावर कोणाचाही संशय आला नाही. यासोबतच वृत्तवाहिन्यांमध्ये कश्मिराच्या यशाच्या बातम्या प्रसारित झाल्याने बनावाला मदतच मिळत होती. हे दोघेही केंद्र सरकारचे व्हीव्हीआयपी ओळखपत्र आणि बॅच लावत असत.

follow us