यूपीएससीत ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे राज्यात पहिली, पाहा निकाल
UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा (UPSC exam result 2022) निकाल जाहीर असून इशिता किशोर देशात पहिली तर ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे राज्यात पहिली आली आहे. कश्मिरा संखे यांना देशातून 25 वी रँक मिळाली आहे. त्या स्वत: डेंटिस्ट डॉक्टर आहेत. आपला व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश संपादन केले आहे. आपल्या या यशाचं श्रेय त्यांनी आपल्या आईवडिलांना दिले आहे.
लोकसेवा आयोगाने 24 एप्रिल ते 18 मे 2023 या कालावधीत 582 उमेदवारांनी तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती. यंदाच्या यूपीएससी निकालात मराठी मुलांचा दबदबा पाहायला मिळतोय. यामध्ये ऋचा कुलकर्णी (54) वसंत दाभोळकर (76), प्रतिक जराड (122), जान्हवी साठे (127), गौरव कायंदे पाटील (146), ऋषिकशे शिंदे (183), अमर राऊत (277), अभिषेक दुधाळ (278), श्रुतिषा पाताडे (281), स्वप्नील पवार (287), अनिकेत हिरडे (349), संकेत गरुड (370), ओमकार गुंडगे (380), परमानंद दराडे (393), मंगेश खिलारी (396) वा क्रमांक पटकावला आहे.
UPSC Result : वडील चहाच्या टपरीवर अन् आई बिडी वळायची; अहमदनगरच्या मंगेशचे डोळे दिपवणारे यश
सागर खराडे (445), करण मोरे (448), पल्लवी सांगळे (452), आशिष पाटील (463), अभिजीत पाटील (470), शशिकांक नरवडे (493), प्रतिभा मेश्राम (527), शुभांगी केकाण (530), प्रशांत डगळे (535), लोकेश पाटील (552), प्रतीक्षा कदम (560), मानसी सकोरे (563), जितेंद्र कीर (569), मानसी साकोरे (563), अमित उंदिरवादे (581), अक्षय नेर्ले (635), प्रतिक कोरडे (638), करण मोरे (648), शिवम बुरघाटे (657) तर केतकी बोरकर (666), सुमेध जाधव (687) वा क्रमांक पटकावला आहे.
शिवहर मोरे (693), सिद्धार्थ भांगे (700), स्वप्नील डोंगरे (707), उत्कर्षा गुरव (709), राजश्री देशमुख (719), महारुद्र भोर (750), स्वप्नील सैंदणे (799), संकेत कांबळे (810), निखिल कांबळे (816), गौरव अहिरराव (828), श्रुती श्रोते (859), तुषार पवार (861), दयानंद तेंडोलकर (902), आरव गर्ग (919) व्या क्रमांकावर आहे.